केरळच्या महिला आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा
पीडित महिलेला उलट बोलणं भोवलं;
लाइव्ह डिबेड शोदरम्यान घरगुती हिंसाचाराला बळी पडलेल्या एका महिलेबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी केरळ महिला आयोगाच्या अध्यक्षा एम. सी. जोसेफाईन यांना द्यावा लागला आहे. एका मल्याळी वृत्तवाहिनीने महिलांवरील कौटुंबीक अत्याचार या विषयावर डिबेट शो आयोजीत केला होता. या शोसाठी तिथं वेगवेगळ्या क्षेत्रातील महिला कार्यकर्त्या आल्या होत्या. त्यांच्या समोरच एम. सी. जोसेफाईन या पीडित महिलेला 'मग भोगा तुम्ही" असं म्हटल्याने वाद झाला.
नेमकं काय घडलं?
महिलांवरील कौटुंबीक अत्याचार या विषयावर एका मल्याळी वाहिनेने चर्चासत्र आयोजीत केलं होतं. चर्चासत्रात फोन-इन सुविधा असल्याने त्यांना एका महिलेने फोन केला. महिलेने फोनवरून कार्यक्रमात आपली व्यथा मांडली.
"नवरा आणि सासू आपल्याला मारहाण करतात. पण मी अद्याप पोलिसांत तक्रार दाखल केलेली नाही किंवा त्याविषयी अद्याप कुणाला काही सांगितलेलं देखील नाही" असं ती महिला फोनवर सांगत होती. जोसेफाई यांचा ताबा सुटला आणि त्यांनी "मग भोगा तुम्ही" असं सुनावलं.
दरम्यान, या प्रकरणावरुन त्यांच्यावर टीका झाली. टीका होऊ लागल्यानंतर जोसेफाईन यांनी या प्रकरणावरून माफी देखील मागितली. पण विरोधक आणि माध्यमांनी हा विषय उचलन धरल्याने अखेर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.