Epstein files : शोषणातून वाचलेल्या स्त्रियांचा आकोश

लेखक - डॉ. सुभाष के देसाई

Update: 2025-12-19 10:00 GMT

वॉशिंग्टन डीसी - १९ डिसेंबर एपस्टीन फाईल जगजाहीर होण्याच्या अगोदर काही तास एबीसी न्यूज लाईव्ह ने त्या गुप्त बेटावर ज्या स्त्रियांची शोषण झाले त्यापैकी सात स्त्रियांच्या मुलाखती जाहीर केल्या. त्यामध्ये मरीना लेसरडा या स्त्रीने सांगितले की ती नऊ वर्षाची होती तेव्हापासून सतरा वर्षापर्यंत एपिस्टनने तिला गुप्त बेटावर नेऊन अनेक बड्या धेंड्यांच्या बरोबर झोपायला लावले आणि 2008 ला एफबीआयने एपिस्टंटला अटक केल्यानंतर तिचे नाव पुढे झाले सर्वत्र प्रसिद्ध झाले आणि तिला त्याची काही कल्पना नव्हती दर आठवड्याला हजार दीड हजार डॉलर एपिस्टंट तिला शरीर विक्री बद्दल देत होता वर्षाला 18000 डॉलर तिला मिळत अनेक अल्पवयीन मुलींना आणून त्यांचे लैंगिक शोषण या बेटावर होत असे.

या सात शोषित मुलींनी नावानिशी येऊन जनतेसमोर आपल्या व्यथा मांडल्या त्यांनी आपल्यावर अत्याचार आणि शोषणाला वाचा फोडण्यासाठी खूप वेळ लागला तोपर्यंत खूप सहन केले आहे अशी व्यथा मांडली ट्रम्प सरकारने आम्हाला या प्रकरणात कोणताही न्याय दिलेला नाही कारण ते स्वतःच त्यामध्ये गुंतलेले होते वर्षानुवर्षी आमचे शोषण केले तो मेल्यानंतरच आमची आता तोंड उघडले आहे. तीनशे स्त्रिया यातून वाचल्या असून आता देखील त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी कोणी घेत नाही आज समाज कुटुंबीय आमच्याकडे दूषित नजरेने पाहतात जगणे कठीण बनले आहे शरीर मन एका शॉक मधून बाहेर येत आहे काही स्त्रियांनी ब्रिटनच्या प्रिन्सने केलेल्या अत्याचाराची कहाणी सांगितली आणि त्या आयलँड वर एका जेट द्वारे आणून सोडल्यावर आणि एक बोटच उपलब्ध असल्यामुळे बेटाच्या बाहेर कोणालाही पडता येत नव्हते आणि वेगवेगळ्या स्त्रियांनी याबाबत असे सांगितले की कोणत्याही स्त्रीच्या नशिबी असा अनुभव येऊ नये"

लेखक -

डॉ. सुभाष के देसाई

९४२३०३९९२९

सौजन्य -https://youtu.be/_FSRkrRce40

Tags:    

Similar News