नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत अभ्यास केला असता अनेक स्त्री उमेदवार हे घराणेशाहीचे होते..
पूर्वी घराणेशाही म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी असे समीकरण होते पण त्यातील बहुसंख्य नेते हे भाजपमध्ये गेल्याने आज भाजप हा घराणेशाही असलेला सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. एकूण उमेदवारात घरणेशाहीचे जास्त उमेदवार आज भाजपाचे आहेत...
*सविस्तर माहिती*
घराणेशाहीचे विजयी उमेदवार
नंदुरबार - रत्ना रघुवंशी(शिंदे सेना) आमदार रघुवंशी यांच्या पत्नी
दोंडाईचा - नयनकुंवर रावल(भाजप) मंत्री रावल यांची आई
बुलढाणा - पूजा गायकवाड( शिंदेसेना) आमदार संजय गायकवाड यांची पत्नी
खामगाव - अपर्णा फुंडकर(भाजप) मंत्री आकाश फुंडकर यांची भावजयी
यवतमाळ - प्रियदर्शिनी उईके (भाजप) मंत्री अशोक उईके यांची मुलगी
पुसद - मोहिनी नाईक (राष्ट्रवादी अजित पवार) मंत्री इंद्रनील नाईक यांच्या पत्नी
धामणगाव रेल्वे अर्चना रोठे ( भाजप)- आमदार प्रताप अडसर यांच्या भगिनी
साकोली देवश्री कापगते (भाजप) माजी आमदार हेमकृष्ण कापगते यांची सून
पंढरपूर - प्रणिती भालके (स्थानिक आघाडी) आमदार भगीरथ भालके यांची पत्नी
अनगर - प्राजक्ता पाटील (भाजप ) माजी आमदार राजन पाटील यांची सून
जामनेर - साधना महाजन(भाजप) मंत्री गिरीश महाजन यांची पत्नी
चाळीसगाव - प्रतिभा चव्हाण (भाजप) आमदार मंगेश चव्हाण यांची पत्नी
पाचोरा- सुनिता पाटील (शिंदेसेना) आमदार किशोर पाटील यांची पत्नी
मुक्ताईनगर -संजना पाटील( ठाकरे सेना) आमदार चंद्रकांत पाटील यांची मुलगी
संगमनेर - मैथिली तांबे (आघाडी) येथे आमदार सत्यजित तांबे यांची पत्नी
मुरगूड - सुहासिनी परदेशी (शिंदे सेना) येथे माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांची पत्नी
कागल - सेहरनिदा मुश्रीफ( अजित पवार राष्ट्रवादी) मंत्री हसन मुश्रीफ यांची सून
गंगाखेड - उर्मिला केंद्रे (अजित पवार) माजी मंत्री धनंजय मुंडे यांची बहीण
हिंगोली - रेखा बांगर (शिंदे सेना) आमदार बांगर यांची वहिनी
*घराणेशाहीचे* *पराभूत** *उमेदवार*
रत्नागिरी - शिवानी सावंत (ठाकरे सेना)माजी आमदार सुरेंद्र माने यांची सून
गडहिंग्लज - स्वाती कोरे (जनता दल) माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांची मुलगी
मुरगूड - तसनीम जमादार (राष्ट्रवादी शरद पवार) माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार यांची पत्नी
संगमनेर - सुवर्णा खताळ( शिंदेसेना ) आमदार अमोल खताळ यांची वहिनी
भुसावळ - रजनी सावकारे (भाजप) मंत्री संजय सावकारे यांची पत्नी
पंढरपूर - श्यामल शिरसाट (भाजप);माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट यांच्या पत्नी
देवळी (वर्धा) - शोभा तडस (भाजप)-माजी खासदार रामदास तडस यांची पत्नी
यवतमाळ - प्रियंका मोघे (कॉंग्रेस) माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांची सून
बार्शी - निर्मला बारबोले (ठाकरे सेना)माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले यांची पत्नी
करमाळा - सुनीता देवी (भाजप) २७वर्ष नगराध्यक्ष राहिलेल्या गिरधर दासदेवी यांची सून
दर्यापूर - नलिनी भारसाकळे (भाजप) अकोटचे आमदार प्रकाश भारसाकळे यांची पत्नी
पारोळा-अंजली पवार (शिवसेना ठाकरे) माजी नगराध्यक्ष करण पवार यांची पत्नी
पेठ वडगाव - प्रणिता सालपे (जनसुराज्य) माजी नगराध्यक्ष कुटुंबातील
वाशिम नितेश मलिक (भाजप)माजी आमदार लखन यांचे पुत्र
वाशिम - सीमा राजगुरू(भाजप ) माजी आमदार पुरुषोत्तम राजगुरू यांची पत्नी
अकोट - रजिया खतीब ( आघाडी) माजी आमदार खतीब यांची पत्नी
बुलढाणा - अर्पिता शिंदे(भाजप )माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या पत्नी
अनुराधा आदिक( काँग्रेस ) वडील गोविंदराव आदिक माजी मंत्री व प्रदेशाध्यक्ष
पद्मजा देशमुख (स्थानिक आघाडी) माजी आमदार राजीव देशमुख यांच्या पत्नी
सुचेता वाघ (भाजप) आमदार दिलीप वाघ यांच्या पत्नी
अंजनगाव - सुर्जी यश लवटे (ठाकरे सेना) आमदार गजानन लवटे यांचा मुलगा
भंडारा - डॉ आश्विनी भोंडेकर(शिंदेसेना)आमदार नरेंद्र भोंडेकर यांची पत्नी
तुमसर- कल्याणी भुरे (शिंदे सेना) माजी आमदार डायगव्हाणे यांची मुलगी