प्रियंका चतुर्वेदींनी मांडला चिनच्या ताब्यत असलेल्या भारतीय नाविकांचा मुद्दा

Update: 2021-02-10 02:30 GMT

सभापती म्हणाले "मुद्दा महत्वपुर्ण है"

राज्यसभेच्या शुन्य प्रहरात शिवसेनेच्या राज्यसभेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी चिनच्या ताब्यात असलेल्या भारतीय नाविकांना पुन्हा देशात आणण्याचा मुद्दा मांडला. प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या की, "चिनच्या बंदरांत अडकेल्या भारतीय नाविकांना आपल्या देशात परत कधी आणणार? गेल्या वर्षी जुलैपासून भारतीय जहाज एमव्ही जग आनंद चीनी बंदरात अडकले होते. एमव्ही जग आनंदमधील 23 भारतीय नाविक मागील महिन्यात घरी परत आले पण एमव्ही अनास्तासियामध्ये असलेले भारतीय कधीपर्यंत मायदेशी परतणार आहेत?"

खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी मांडलेल्या मुद्द्यावर सभापती व्यंकया नायडू यांनी "मुद्दा महत्वपुर्ण है" असं म्हणत संबंधीत मंत्र्यांना यावर उत्तर देण्यास सांगीतलं.

Full View


Similar News