''मंत्रिपद द्यायचं नव्हतं पण लेकरू मारायचं नव्हतं'' मेटेंच्या आईचे आरोप कोणावर?
'' आमदारकी द्यायचं नव्हतं, मंत्रिपद द्यायचं नव्हतं पण त्यांनी माझं लेकरू मारायचं नव्हतं.'' विनायक मेटे यांच्या आईचे आरोप नक्की कोणावर? विनायक मेटे यांचा अपघात होता की घातपात? याची चौकशी करण्याची मागणी..;
रविवार १४ ऑगस्ट रोजी पहाटे माजी आमदार शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचा अपघातात मृत्यू झाला. मराठा समाजाच्या बैठकीसाठी पुण्याहून मुंबईला येत असताना खोपोली बोगद्याजवळ त्यांच्या गाडीला अपघात झाला. डोक्याला जबर मार लगाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. विनायक मेटे यांच्या अपघाती निधनानंतर अनेक सवाल उपस्थित करण्यात आले आहेत. अनेकांना हा अपघात नसून घातपात असल्याची देखील शक्यता वर्तवली आहे. त्यांच्या कुटुंबियांनीच हा घात-पात तर नाही ना अशी शंका उपस्थित करीत चौकशीची मागणी केली आहे. त्याच्या आईने मंत्रिपद दिले नसते तरी चालले असते पण माझं लेकरू मारायचं नव्हतं अशी प्रतिक्रिया दिली. त्यांच्या आईने टीव्ही ९ या मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना ही प्रतिकिया दिली आहे. त्यांच्या या प्रतीकियेनंतर त्यांचा हा आरोप नक्की कोणावर? विनायक मेटे यांना मंत्रिपद द्यावे लागेल म्हणून हा घातपात करण्यात आला आहे का? अशा अनेक चर्चा आता सुरु झाल्या आहेत.
विनायक मेटे यांचा अपघातात मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या अपघाताची चौकशी करण्याची मागणी होत आहे. त्यांच्या कुटुंबियांनीच हा घात-पात तर नाही ना अशी शंका उपस्थित करीत चौकशीची मागणी केली आहे. मेटे यांच्या पत्नीने देखील अपघात कसा घडला कळलं पाहिजे. चौकशी व्हायला हवी, अशी मागणी केली आहे. त्यानंतर त्यांच्या आईने टीव्ही ९ या मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना '' आमदारकी द्यायचं नव्हतं, मंत्रिपद द्यायचं नव्हतं पण त्यांनी माझं लेकरू मारायचं नव्हतं.'' असं म्हंटल आहे. विनायक मेटे यांच्या आईच्या या वक्तव्यानंतर अनेकांनी हा अपघात नेमका अपघात झाला कसा? अपघातानंतर रुग्णसेवेला एवढा उशीर का? मराठा आरक्षणाच्या बैठकीच्या वेळेत अचानक बदल कसा झाला? असे अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत..