देशातील तरुणींना ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार यांचा सल्ला

Update: 2021-02-19 08:15 GMT

"मला देशातील तरुणींना बिन माँगे एक सल्ला द्यायचा आहे. तुम्ही तुमचा जोडीदार निवडताना जातीयवादी व्यक्ती निवडू नका. जो इतरांचा द्वेष करतो तो कधीही तुझ्यावर प्रेम करू शकत नाही. कदाचीत तुम्ही तुमच्या पसंतीने किंवा पालकांच्या पसंतीने लग्न केलं असेल पण अशा लोकांना तुम्ही तुमचा पाठिंबा देऊ नका."

कारण जातीवादी लोक फक्त राजकीय जिवनातच नव्हे तर वैयक्तिक जिवनातही दंगली करतात. ते कधीच प्रामाणीक प्रेमी होऊ शकत नाहीत. ते तुमच्यावर दमदाटीही करतील. बर असही नाही की मुली जातीयवादी नाहीत. पण मग अशा मुलींना त्यांच्या जोडीदाराने भावाने वडिलांनी सतर्क केले पाहिजे.

ज्या समाजात प्रेम करणे अवघड होतं तरुणांना त्या समाजात राहण्याची इच्छा नसते. आणि जरी राहिले तरी मन मारुन एक जिवंत प्रेत बनुन..

प्रेम करण्याचे अनेक फायदे आहेत. जेव्हा तुम्ही एखाद्यावर प्रेम करता तेव्हा तुम्ही कुणासाठी तरी खास असता. प्रेमात पडल्यावर कुणासाठी तरी छान सजता, मेकप करत असता. आणि प्रेमातच तुम्ही 'करेंगे या मरेंगे' चं साहस ठेवता. प्रेम करणारे आहेत तसेच प्रेमाचा तिरस्कार करणारेही आहेत.

मला महिती आहे. यावरुनही काही लोक मला शिव्या देतील पण या लोकांना जिवनात कुणाचेच प्रेम मिळत नाही. या लोकांना ते ज्यांच्यासाठी इतरांना शिव्या देत असतात त्यांचं देखील प्रेम मिळत नाही. ही लोक देखील एखाद्यावर प्रेम करतात पण ते प्रेम त्यांना मिळत नाही.

प्रेम करायला कोणत्याही कोणत्याही खास दिवसाची गरज नसते. स्वत:ला एक उत्तम प्रेमी बनवा.. व्यक्त व्हायला शिका.. कारण प्रेम करणे म्हणजे फक्त गुलाब देणे नाही तर झुडुपात फुलासारखं बहरणे म्हणजे प्रेम...

- रवीश कुमार

Tags:    

Similar News