महिलांचे दुय्यमत्व विवाह संस्थेमुळे... | Geetali V M

Update: 2023-06-28 01:30 GMT

समाजात आज पितृसत्ताक संस्कृती आहे आणि याच संस्कृतीमुळे महिलांचे महत्त्व कमी झालं. या सगळ्याला विवाह संस्था कारणीभूत असल्याचं परखड मत मिळून साऱ्याजणी या मासिकाच्या संपादिका गीताली वि. म यांनी व्यक्त केले. यापुढे बोलताना त्या म्हणाल्या, महिलेने घरात राहिले पाहिजे, घरातील काम केले पाहिजे असंच ही पुरुषप्रधान संस्कृती सांगते. महिला घरात राब-राब राबतात याचं तिला कोणतेही वेतन मिळत नाही. वेतन मिळत नाही म्हणून तिला प्रतिष्ठा मिळत नाही, तिला सन्मान मिळत नाही. पुरुष पैसे कमवतो म्हणून त्याला मान मिळत. संपूर्ण स्थावर, जंगम संपत्ती त्याच्या नावावरती असते. त्यामुळे विवाहामध्ये नवरा आणि बायको यांचा संबंध हा जवळ जवळ नोकर आणि मालक असा आहे.

त्यामुळे ज्यावेळी एखादी महिला पुरुषाच्या मनाविरुद्ध करते त्यावेळी तो नवरा तिच्या विरुद्ध काहीही करू शकतो. आणि यातून तिचा संघर्ष सुरू होतो. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुरुषांना नेहमी भीती असते की जे मूल आपण संभाळत आहोत ते आपलंच आहे का? आणि याच भेटीतून तो स्त्रियांवर अनेक बंधन लादतो. त्यामुळे स्त्रियांवर तिने कुठे जायचं, कुठे जायचं नाही, केव्हा जायचं अशी अनेक बंधन येतात. अशाप्रकारे महिलांच्या संचारावर, आचारावर, विचारावर सर्व प्रकारे बंधने येण्यास विवाह संस्था कारणीभूत असल्याचं त्यांनी म्हणत त्यांनी याविषयी अत्यंत सविस्तर मांडणी केली आहे हा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा...


Full View 

Tags:    

Similar News