डोक्यावर सिलेंडर घेत मंत्री ॲड. ठाकूर यांनी केला केंद्र सरकारचा निषेध

Update: 2022-04-04 11:07 GMT

 पाच राज्यातील निवडणुका संपताच अपेक्षेप्रमाणे देशात महागाईचा विस्फोट झाला आहे. केंद्रात मोदी सरकार आल्यापासून निवडणुकीचा हंगाम वगळता सातत्याने महागाई वाढत चालली आहे, असा आरोप काँग्रेस नेत्या व अमरावतीच्या पालकमंत्री तथा महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केला, अमरावती येथील इर्विन चौकात ॲड. यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटी ग्रामीणच्यावतीने हे आंदोलन करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. या आंदोलनात डोक्यावर सिलेंडर घेऊन त्या मोदी सरकारच्या महागाई विरोधातील 'महागाई मुक्त भारत' आंदोलनात सहभागी झाल्या. तसेच त्यांनी केंद्र सरकारचा जाहीर निषेध करीत घोषणाही दिल्या. निवडणूक संपली की भाव वाढ हे काही योग्य नाही, त्यामुळे आता जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय रहाणार नाही असा इशारा मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिला. तसेच केंद्र सरकारच्या दुजाभावामुळे केंद्र आणि राज्य हा संघर्ष या देशाला कुठे घेऊन जाईल सांगता येत नाही, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली. या आंदोलनात हजारो कार्यकर्ते आणि जनता मोठया संख्येने सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले.




Tags:    

Similar News