पंतप्रधान पीक विमा का मिळत नाही, रक्षा खडसें यांचा लोकसभेत केंद्र सरकारला सवाल

Update: 2021-08-03 15:20 GMT

गेल्या दोन वर्षापासून नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेचेचा राज्य सरकार कडून लाभ मिळत नाही तसेच बँकाच्या चुकांमुळे शेतकऱ्यांना लाभापसून वंचित राहावे लागते केंद्र अनेक शेतकरी पीक विमा मिळत नसल्याने वंचित आहेत भरपाई कधी मिळेल याबाबत रावेरच्या भाजप खासदार रक्षा खडसें यांनी लोकसभेत केंद्र सरकारला प्रश्न उपस्थित केला.

शेतकऱ्यांच केळी तसेच इतर फळपिकांचही नुकसान झालं, शासकीय स्तरावर तसेच पीकविमा कंपन्यांनीही नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे केले, मात्र अनेक दिवस उलटूनही नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेतून भरपाई मिळाली नाही याबाबत अनेकदा जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश देऊनही शेतकऱ्यांना भरपाई मिळाली नाही आज भाजपच्या खासदार रक्षा खडसेंनी लोकसभेत हा मुद्दया कडे लक्ष वेधत प्रश्न उपस्थित केला.

Full View

रक्षा खडसेंच्या या प्रश्नाला केंद्रीय कृषीराज्य मंत्री कैलास चौधरी यांनी ही उत्तर देत नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही याकडे सरकार गांभीर्याने घेतले असून मदत तातडीने मिळेल असं आश्वासन दिल दरम्यान बँकांनी भरपाई देण्यास उशीर केला तर 12 टक्के व्याज भरपाई म्हणून शेतकऱ्यांना द्यावं लागणार आहे.

Tags:    

Similar News