इतक्या दिवस गायब असलेल्या अमृता फडणवीस अवतरल्या..

Update: 2022-07-05 07:37 GMT

राज्याच्या राजकारणात इतक्या महत्त्वाच्या घडामोडी होत असताना नेहमीच समाज माध्यमांवर सक्रिय असणाऱ्या विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या मात्र मागच्या अनेक दिवसांपासून शांत होत्या. त्या कुठेही दिसल्या नाहीत किंवा त्यांनी याविषयी काहीही भाष्य केलं नाही. त्यामुळे मागच्या काही दिवसांपासून त्या नक्की शांत का आहेत? असा प्रश्न आता समाजमाध्यमांवर उपस्थित केला जात होता. राज्याच्या राजकारणात कुठलीही महत्त्वाची घडामोड घडली तर अमृता फडणवीस त्यावर लगेच व्यक्त होतात. त्या ट्विटर, फेसबुक या माध्यमातून आपलं मत व्यक्त करत असतात. मात्र मागच्या काही दिवसांपासून राज्यात सुरु असलेल्या राजकीय घडामोडींवर मात्र अमृता फडणवीस यांनी मौन धरले आहे. काही ट्विट त्यांनी केले पण त्या राजकीय घडामोडींवर काहीही बोलल्या नाहीत. त्यांनी काही वेळा राजकीय घडामोडींवर व्यक्त होण्याचा प्रयत्न केला त्या एकदा ट्विटर च्या माध्यमातून व्यक्त ही झाल्या. मात्र त्यांनी काही मिनिटातच ते ट्विट त्यांनी डिलिट केलं. त्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंदनाचे ट्विट केले. माञ इतर वेळी त्या ज्या प्रकारे त्या व्यक्त होतात त्या प्रकारे त्या व्यक्त होताना दिसल्या नाहीत.

राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होणार असे सर्वांना वाटत असताना देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होतील असं सांगितलं व मी कुठलाही पदभार स्वीकारणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केलं. त्यानंतर काही वेळातच पक्षश्रेष्ठींचा आदेश आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या सगळ्या प्रकारानंतर देवेंद्र फडणवीस हे नाराज असल्याची चर्चा आहे. त्याच नाराजीमुळं अमृता फडणवीस शांत होत्या का? असे देखील म्हटलं जात होतं. त्यानंतर अमृता फडणवीस या लंडनमध्ये असल्याचं समजलं. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातूनच त्यांचे फोटो शेअर केले.

देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंत ते आज नागपुरात दाखल झाले. फडणवीस यांची नागपूर शहरातून मिरवणूक काढत त्यांचं स्वागत सुरू आहे. या स्वागत मिरवणुकीत मागच्या इतक्या दिवसांपासून कुठेही न दिसलेल्या अमृता फडणवीस देखील सहभागी झाल्या आहेत. त्यामुळे मागच्या इतक्या दिवसांपासून समाज माध्यमांवर जो प्रश्न उपस्थित केला जात होता की, अमृता फडणवीस नक्की कुठे आहेत? या सर्व प्रश्नांना आता पूर्णविराम मिळाला आहे..




 


Tags:    

Similar News