देशात 2024 चा प्रधानमंत्री कोण ? आता महिलाच ठरवणार

Update: 2024-03-16 12:09 GMT

यंदाची लोकसभा निवडणूक कोण जिंकणार आणि कोण हारणार यापेक्षा देशाच्या लोकसभेची सत्ता कोण ठरवणार याची चर्चा निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेनंतर समाज माध्यमांवर होतं आहे. निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार यंदाच्या निवडणुकीत महिला मतदारांची संख्या वाढली असून लोकसभेच्या सत्तेची सूत्र महिलाच ठरवतील असं दिसत आहे.

निवडणूक आयोगाकडून दिनांक 16 मार्च रोजी महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद घेण्यात आली, देशाच्या लोकसभा निवडणुकींसाठी ही पत्रकार परिषद खूप महत्वपूर्ण ठरणार आहे. अनेक मतदारसंघांमध्ये महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त झाली असल्याची माहिती निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदे देण्यात आली आहे.

नवीन मतदारांची संख्या १.८२ कोटी असून देशात नवीन मतदारांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.

भारतात एकूण मतदारांची संख्या ९७ कोटींहून अधिक असल्याची माहिती पुढे आली आहे. या सर्व मतदारांनी व्यवस्थित आपापल्या बूथवर जाऊन मतदान करावं यासाठी ईव्हीएमच्या संख्येत वाढ केली आहे. निवडणुकीसाठी ५५ लाखांहून अधिक इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (ईव्हीएम) मशीन उपलब्ध आहेत. तर देशात दीड कोटी निवडणूक अधिकारी कार्यरत असून १६ जून रोजी लोकसभेचा कार्यकाळ संपणार आहे आणि [पहिल्या टप्प्यातील निवडणूका 19 एप्रिल पासून चालू होणार आहेत.

यंदाच्या लोकसभा निवडणुकांमध्ये महिला केवळ महत्वपूर्ण भूमिकाचं बजावणार नसून सत्तेची सूत्र फिरवण्याची ताकत ठेवणार असल्याची आकडेवारी निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदे देण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार देशाचं भवितव्य घडवण्यासाठी ४७. १ कोटी महिला मतदान करणार तर ४९.७ कोटी पुरुष मतदान करणार आहेत. यंदाच्या निवडणूक यादीत १८ हजार तृतीय पंथीय असल्याची माहिती देखील निवडणूक आयोगाने दिली आहे.

भारतात लोकशाहीचा उत्सव लवकरच रंगणार आहे. महिला मतदारांची वाढती संख्या आणि नवीन मतदारांची उत्सुकता निवडणूक अधिक रोमांचक बनवेल. निवडणूक आयोगाने निवडणूक स्वच्छ आणि निष्पक्षपणे पार पाडण्यासाठी सर्वतोपरी तयारी केली आहे. देशातल्या १२ राज्यांमध्ये महिला मतदारांची संख्या वाढली असून १२ राज्यांमध्ये महिला मतदारांची संख्या पुरुष मतदारांच्या तुलनेत जास्त असल्याने लोकसभेची सत्ता कोणाच्या हाती जाणार आणि कोण प्रधानमंत्री होणार हे महिलाच ठरवतील 

Tags:    

Similar News