कोल्हापुर उत्तर विधाननसभा जिंकणाऱ्या जयश्री जाधव कोण आहेत?

कोल्हापूर मध्ये विजयी होणाऱ्या जयश्री जाधव या भाजपच्या नगरसेविका होत्या. मग त्यांनी काँग्रेसची उमेदवारी का स्विकारली? जाणून घेण्यासाठी वाचा हा रिपोर्ट...

Update: 2022-04-16 08:44 GMT

कोल्हापूर हे जणू पोटनिवडणूकीमुळे राजकीय रणांगण झालं होतं. या निवडणुकीचा आज निकाल लागतोय. काँग्रेस उमेदवार जयश्री पाटील यांनी ९२ हजारापेक्षा जास्त मतं मिळवत त्या विजयी झाल्या आहेत पण भाजप उमेदवाराच्या नाकेनऊ आणणाऱ्या जयश्री पाटील नेमक्या कोण आहेत हे सांगणारा हा रिपोर्ट...

महिन्याभरापासून कोल्हापूर मध्ये विधानसभा पोटनिवडणुकीचा धुरळा सुरू होता. कोल्हापूर उत्तर विधानसभेचे दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या अकाली मृत्यूमुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणुक झाली. या निवडणुकीमधे महाविकास आघाडीकडून ही जागा काँग्रेसला देण्यात आली आणि काँग्रेसकडून या जागेवर दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नि जयश्री जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आणि पहिल्यांदा कोल्हापूर उत्तर विधानसभेमध्ये महिला आमदार निवडून येणार अशी शक्यता निर्माण झाली. जयश्री पाटील यांना काँग्रेसकडू्न उमेदवारी मिळाल्यानं भाजप समोर नवा पेच पडला होता.का ते पाहूयात

कोण आहेत जयश्री जाधव?

जयश्री जाधव या काँग्रेसचे दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी आहेत. पण फक्त इतकीच त्यांची ओळख नाहीये. त्या कोल्हापूर महानगरपालिकेत नगरसेविका म्हणून कार्यरत होत्या तेही भाजपच्या!बसला ना धक्का.. होय चंद्रकांत जाधव हे जरी काँग्रेसचे आमदार होते तरी त्यांच्या पत्नी जयश्री जाधव या भाजप नगरसेविका म्हणून काम करत होत्या. म्हणजे जाधव कुटूंबाचं एक पाऊल मविआ मध्ये होतं तर एक पाऊल भाजपमध्ये!

भाजपकडून होती उमेदवारीची ऑफर...

जयश्री जाधव या भाजपच्या नगरसेविका असल्याने भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांना या पोटनिवडणूकीत भाजपकडून लढण्याची ऑफर दिली होती. पण जयश्री पाटील यांनी काँग्रेसकडून ही निवडणूक लढवण्यास पसंती दिली. त्यांचा हा निर्णय भाजपला तसा धक्काच देणारा होता.भाजपनेही मग काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक सत्यजजित कदम यांना आपल्या गोटात घेऊन उमेदवारी दिली.

कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या निकालाचा कल पाहता जयश्री जाधव या विजयी झाल्या आहेत. जयश्री जाधव या विधानसभेत गेल्यानंतर कशापध्दतीने प्रश्न मांडतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Tags:    

Similar News