नोकरशाहीची लायकी काय?, ते तर आमच्या चपला उचलतात; उमा भारतींच वादग्रस्त विधान

Update: 2021-09-20 12:25 GMT

भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती यांनी आज वादग्रस्त विधान केले आहे. त्यांनी नोकरशाहीचे वर्णन चप्पल उचलणारे म्हणून केले. उमा भारती म्हणाल्या की, नोकरशाही म्हणजे काही नाही, ते चप्पल उचलणारे असतात. आमच्या चप्पल उचलतात आणि आम्ही सुद्धा त्यासाठी सहमत असतो.

पुढे बोलतांना त्या म्हणाल्यात की, तुम्हाला काय वाटते, नोकरशाही नेत्यांना फिरवतात?, तसं काहीच नसते. आधी खाजगीत चर्चा होते, त्यांनतर नोकरशाही मधले अधिकारी फाईल बनवून आणतात. आम्हाला विचारा कारण, 11 वर्ष केंद्रात मंत्री आणि मुख्यमंत्री सुद्धा राहिलो आहेत. त्यामुळे आधी आम्ही बोलतो, पुढे चर्चा होते आणि त्यांनतर फाइलवर निर्णय घेतला जातो, असेही उमा भारती म्हणाल्यात.

उमा भारती एवढ्यावरचं नाही थांबल्या तर, पुढे म्हणाल्या की, सर्व फालतू चर्चा आहे, नोकरशाही फिरवते , कारण फिरवूच शकत नाही. आम्ही त्यांना पगार देत आहोत, आम्ही त्यांना पोस्टिंग देत आहोत, आम्ही त्यांना पदोन्नती देत ​​आहोत. त्यामुळे त्यांची लायकी नाही. खरी गोष्ट अशी आहे की, आम्ही नोकरशाहीच्या नावाने आपले राजकारण करतो, असेही उमा भारती म्हणाल्या आहेत.

शनिवारी ओबीसी महासभेचे एक शिष्टमंडळ माजी केंद्रीय मंत्री उमा भारती यांच्या भोपाळ येथील बंगल्यावर भेटीसाठी गेले होते. या दरम्यान, शिष्टमंडळाने उमा भारती यांना ओबीसींच्या जाती जनगणनेत आरक्षण आणि खाजगीकरणाबाबत 5 कलमी मागण्यांबाबत निवेदन सादर केले होते. यावेळी बोलतांना उमा भारती यांनी असे विधान केले.

Tags:    

Similar News