अजित पवारांच्या भूमिकेबद्दल रूपाली ठोंबरे काय म्हणतात एकदा पहा..

Update: 2023-07-05 02:05 GMT

राष्ट्रवादी पक्षाचे नेते शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. त्यानंतर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत राष्ट्रवादीतील आठ नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. या घटने नंतर रुपाली ठोंबरे-पाटील यांनी खळबळजन प्रतिक्रिया दिली. शिवाजी महाराज जसा तह करायचे तसाच तह अजित पवार यांनी केला असल्याचं रुपाली ठोंबरे यांनी म्हटलं

“अजित पवार यांनी घेतलेल्या शपथविधीला बंड म्हणणं चुकीचं आहे. सत्ताधाऱ्यांमध्ये अजित पवार मित्र पक्ष म्हणून सामील झाले आहेत. गुवाहाटी किंवा कुठेही पळून न जाता अजित पवार राज्य सरकारमध्ये सामील झाले आहे. अजित पवार मित्र पक्ष म्हणून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये गेले आहे. छत्रपती शिवाजी महाराज युद्ध जिंकण्यासाठी ज्या प्रकारे तह करायचे, तसाच अजित पवारांनी हा तह केला" असल्याचं त्या म्हणाल्या आहेत.

दरम्यान त्यांनी अजित पवार यांना साथ दिली आहे. त्यांची राष्ट्रवादी प्रवक्ते पदी नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ट्विट करत दिली आहे. ते म्हणाले की अ‍ॅड. रुपालीताई ठोंबरे-पाटील यांची आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रवक्ते पदी नियुक्ती करण्यात आली. त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करत शुभेच्छा दिल्या आहेत

Tags:    

Similar News