प्रबोधनकार ठाकरे कडवे हिंदुत्ववादी : उर्मिला मातोंडकर

Update: 2021-01-21 14:15 GMT

ज्येष्ठ समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे यांच्या शतकोत्सवानिमित्त संवाद पुणेतर्फे प्रबोधन महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं होतं. या महोत्सवावेळी मातोंडकर बोलत होत्या.

मातोंडकर म्हणाल्या की, "पुरोगामी महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय इतिहासात प्रबोधनकार ठाकरे यांचं नाव नसेल, तर तो इतिहास कधीच पूर्ण होऊ शकत नाही. प्रबोधनकारांबद्दल दोन नाही, तर जास्त शब्दात बोलेन, कारण ते व्यक्तिमत्त्व अचाट आणि अफाट आहे. केशव सीताराम ठाकरे यांचा जन्म अत्यंत गरीब कुटुंबात झाला. लहानपणापासूनच त्यांना वाचन आणि शिक्षणाची विलक्षण ओढ होती. 'वाचाल तर वाचाल' हे त्यांनी युवा पिढीला सांगितलेलं वाक्य मी नेहमी आचरणात आणते. हे वाक्य नेहमीच सत्य राहील."

"प्रबोधनकार ठाकरे भट भिक्षुकशाहीला पूर्णपणे नाकारणारे, तरी सच्चे आणि कडवे हिंदुत्ववादी होते. हिंदू धर्मावरील त्यांचं प्रेम, आस्था आणि श्रद्धा ही त्यांची ओळख होती. हिंदू धर्मात सांगितलेल्या बुरसटलेल्या रुढींच्या ते विरोधात होते, अशा शब्दात अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी प्रबोधनकार ठाकरे यांचं वर्णन केलं.

Tags:    

Similar News