उद्धव ठाकरे यांनी घेतली संजय राऊत यांच्या आईची भेट

Update: 2022-08-01 10:24 GMT

शिवसेना नेते संजय राऊत यांची काल सकाळपासून त्यांच्या घरी ईडीची चौकशी सुरू होती. असंख्य शिवसैनिकांनी भाडूप येथील त्यांच्या घराबाहेत गर्दी केली होती. या सर्व चौकशीनंतर संध्याकाळी ईडीने त्यांना ताब्यात घेण्या अगोदर त्यांच्या आई ने राऊतांचे औक्षण केले आणि मिठी मारताच आईचे अश्रू अनावर झाले होते. या सर्व गोष्टींचा तीच्या मनावर झालेला परिणाम समपूर्ण समाजमाध्यमांनवर पहायला मिळाल. या सर्व प्रकरणामुळे आज शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या घरी जाऊन त्याच्या परिवाराची भेट घेतली.

पत्राचाळ घोटाळा प्रकरणी काल संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेण्यात आले. सध्याकाळी त तसेच त्यांची ईडी कार्यालयात नेऊन चौकशी देखील करण्यात आली होती. अखेर रात्री उशीरा संजय राऊत यांना अटक करण्यात आली. दरम्यान, आता उद्धव ठाकरे संजय राऊत यांच्या परिवाराला धीर देण्यासाठी भांडूप येथील घरी दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्या आईंची भेट घेतली. संकटाच्या काळात मी तुमच्या सोबत आहे, असा शब्द त्यांनी संजय राऊत यांच्या कुटुंबियांना दिला. रविवारी संजय राऊत यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या आईंना अश्रू अनावर झाले होते. तसेच त्याच्या परिवारातील इतर सदस्यदेखील भावूक झाल्याचे बघायला मिळाले. संकटाच्या काळात शिवसेना त्यांच्या पाठिशी आहे, हे दाखवण्याचा उद्धव ठाकरेंचा प्रयत्न आहे. संजय राऊत यांच्या आईंना धीर देण्यासाठी उद्धव ठाकरे राऊत यांच्या निवास्थानी गेले होते.

Tags:    

Similar News