"भाजपच्या टिनपाट प्रवक्त्याने भारताला गुडघ्यावर आणलं" नुपूर शर्मावर उद्धव ठाकरे भडकले..

Update: 2022-06-09 05:34 GMT

 भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या विषयी लाईव्ह चर्चेत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यामुळे झालेल्या वादंगांमुळे भाजपने नुपूर शर्माला निलंबित केलं पण आता नुपूर शर्मा प्रकरणामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतावर टीका होत आहे. याच प्रकरणामुळे आता अल कायदा या दहशतवादी संघटनेने सुद्धा भारतामध्ये आत्मघाती हल्ले करणार असल्याची धमकी दिली आहे. या वादग्रस्त वक्तव्यामुळे अगदी स्थानिक पातळीवरून आंतरराष्ट्रीय पातळीवर नुपूर शर्मा यांच्यावर टीका होत आहे. या प्रकरणावरून काल झालेल्या औरंगाबाद येथील सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'टिनपाट प्रवक्त्यामुळे देशावर नामुष्की ओढवली आहे' असे म्हणत भाजपवर निशाणा साधला.

या सभेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, शिवसेनाप्रमुखांनी मुस्लिम द्वेष करण्यास आम्हाला कधीच शिकवले नाही. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे पाईप आहोत. आमच्या साठी देश हाच धर्म आहे. मात्र कोणी धर्माचं वेड घेऊन आमच्या अंगावर येत असेल तर त्याला आम्ही प्रत्युत्तर देऊ. भाजपच्या कुणीतरी टिनपाट प्रवक्त्यामुळे आज देशांच्या पंतप्रधानांचा फोटो कचराकुंडी वर लावला जात आहे, अरब देश भारताला माफी मागण्याची मागणी करत आहेत. ही सर्व चूक भाजपच्या प्रवक्त्याने केली आहे मग त्यासाठी देशावर नामुष्की कशाला. भाजपची कुठलीही भूमिका ही देशाची भूमिका असू शकत नाही. असं म्हणत भाजपला त्यांनी टोला लगावला आहे.

Tags:    

Similar News