चित्रा वाघ आणि रुपाली चाकणकर यांच्यामध्ये ट्विटर वॉर

Update: 2021-04-08 07:55 GMT

राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यात काही दिवसांपासुन ट्विटर वॉर सुरु असल्याचं दिसून येत आहे. चित्रा वाघ आणि रुपाली चाकणकर ट्विटरवरून एकमेकांवर पलटवार करत आहेत.

गेल्या तीन दिवसांपासून भाजप नेत्या चित्रा वाघ महाविकास आघाडीवर कोणत्या ना कोणत्या कारणांवरुन हल्लाबोल करत आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर त्यांना प्रत्युत्तर देऊन त्यांच्यावर पलटवार करत आहेत. बुधवारी चित्रा वाघ यांनी एक ट्विट करत रुपाली चाकणकर यांना अप्रत्यक्ष उत्तर दिलं आहे. या ट्विटमध्येही त्यांनी चाकणकर यांचं नाव घेतलेलं नाही.

अन्यायाविरोधात आवाज उठवल्यानंतर व त्यातही आवाज उठवणारी जर स्त्री असेल तर व्यक्तिगत आयुष्याचा मुद्दा बनवणारी "ही"मंडळी भ्याडच म्हणावी लागतील सूडाच्या भावनेतून होणारं राजकारण फार काळ टिकणारं नाही हे लक्षात ठेवा,असं चित्रा वाघ यांनी ट्विटमध्ये म्हटलंय.तर रुपाली चाकणकर यांनी देखील चित्रा वाघ यांचं नाव घेता निशाणा साधला आहे.

"ताईंचा नवरा स्वतः भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात अडकलेला आरोपी असून त्यांच्यावर रीतसर गुन्हा दाखल आहे आणि ताई विचारत आहेत नवीन वसुली मंत्री कोण??अहो ताई भावनेच्या भरात इतकंही वाहून जाऊ नका की अंगलट आलं की परत 'पवार साहेब माझ्या वडिलांसारखेच आहेत' हे म्हणायची वेळ येईल.थोडा धीरज रखो , सब सच सामने आयेगा.!!" अशा शब्दात चाकणकर यांनी चित्रा वाघ यांना उत्तर दिलं आहे.

Tags:    

Similar News