'महिला नेत्या हरवल्या आहेत..' शोधून देणाऱ्यास तृप्ती देसाई देणार पाचशे रुपयांचे बक्षीस

“नीलम गोऱ्हे, सुप्रिया सुळे, यशोमती ठाकूर तिघीही हाथरस बलात्कार प्रकरणात खूपच आक्रमकपणे पुढे सरसावल्या होत्या आणि आता "आपला तो बाब्या आणि दुसर्याचे ते कारटे" अशा भुमीकेत आहेत.” असं देखील तृप्ती देसाई यांनी म्हणटलं आहे.

Update: 2021-01-15 07:30 GMT

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री व राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर गायिका रेणू शर्मा यांनी बलात्काराचा आरोप केला. मात्र यावर ठाकरे सरकारमधील एकाही महिला नेत्याची प्रतिक्रिया न आल्याने भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी निशाणा साधला आहे.

तृप्ती देसाई यांनी एक फेसबुक पोस्ट लिहीली असून "नीलम गोर्हे, सुप्रिया सुळे, यशोमती ठाकूर हरवल्या आहेत. कृपया कुणाला दिसल्यास सांगावे, माहिती देणाऱ्यास पाचशे रुपयांचे रोख बक्षीस दिले जाईल." असं या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

काय आहे तृप्ती देसाई यांची फेसबूक पोस्ट?

नीलम गोर्हे, सुप्रिया सुळे, यशोमती ठाकूर हरवल्या आहेत कृपया कुणाला दिसल्यास सांगावे, माहिती देणाऱ्यास पाचशे रुपयांचे रोख बक्षीस देण्यात येइल.

हाथरस प्रकरणात तिघीही खूपच आक्रमकपणे पीडित मुलीला न्याय मिळविण्यासाठी पुढे सरसावल्या होत्या परंतु दुर्दैव असे आहे की आपल्या राज्यात जर एखादी महिला यासाठी आत्ता मंत्रीमंडळात असलेल्या एखाद्या मंत्र्याविरोधात आवाज उठवत आहे ,तिच्यावर अत्याचार झाला आहे असे जर ती सांगत आहे, पोलीसात तक्रार करीत आहे ,पुरावे देत आहे तरी गुन्हा दाखल करण्यास पोलीस टाळाटाळ करत आहेत. तरी तुम्ही तिघी असलेल्या पक्षाच्या युतीच्या महाविकास आघाडी सरकारचे धनंजय मुंडे मंत्री आहेत म्हणून "आपला तो बाब्या आणि दुसर्याचे ते कारटे"अशी भूमिका याबाबतीत तुम्ही घेत आहात असे सर्वसामान्य जनतेला वाटत आहे... महिलांचे सबलीकरण यासाठी आवाज उठवत असताना आपल्या पक्षातील एखाद्या नेत्यावर आरोप झाले तर त्याविषयी बोलायचे नाही अशी भूमिका जर तुमच्यासारख्या महिला नेत्या घ्यायला लागल्या तर महाराष्ट्रात महिला सबलीकरण होणे अशक्य आहे, आपण महाराष्ट्रात असाल तर नक्कीच या प्रकरणावर जाहीरपणे बोला..


Tags:    

Similar News