धनंजय मुंडेच्या जिल्ह्यात चाललंय काय; अत्याचार झालेल्या मुलीवर न्यायासाठी उपोषणाला बसण्याची वेळ

Update: 2021-07-29 01:45 GMT

कोरोना काळात रुग्णांची सेवा करणाऱ्या कोविड योध्यांचा एकीकडे सन्मान करण्यात येतोय, तर दुसरीकडे मात्र कोविड काळात आपला जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणाऱ्या मुलीला अत्यचार झाल्यावर सुद्धा न्याय मिळत नसल्याचे समोर आले आहे. बीडमध्ये अत्याचार झालेल्या मुलीला न्याय मिळावा, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे. या उपोषणात स्वतः पीडित मुलगी सहभागी झाली असून ती न्यायाची प्रतीक्षा करत आहे.

जिल्हा रुग्णालयात सेवा बजावणा-या पीडित मुलीवर गेवराईतल्या एका नराधम मुलाने अत्याचार केला होता. याप्रकरणी पीडित मुलगी बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेली असता पोलिसांनी तिचं ऐकून न घेता आरोपीला पाठबळ दिल्याचा आरोप पीडित मुली कडून करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपीला अटक झाली असली तरी यातील आरोपीचं समर्थन करणाऱ्या संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी पीडित मुलीसह वंचित बहुजन आघाडी कडून करण्यात आली आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून महिला अत्याचाराच्या घटना मोठ्याप्रमाणात वाढल्या आहेत. विशेष म्हणजे राज्यातील सरकारमध्ये मंत्री असेलल्या धनजय मुंडे यांच्या जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून महिला अत्याचार झाल्याच्या अनेक घटना समोर येत आहे. त्यामुळे आत्तातरी मंत्री महोदय ह्या घटना कडे लक्ष देतील का? असा प्रश्न सर्वसामन्यांना पडला आहे.

पोलिसांचा हलगर्जीपणा...

पिडीत मुलीवर अत्याचार झाल्यावर तिने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली, मात्र पोलिसांनी फक्त साधी एन.सी दाखल करून घेतल्याचा आरोप पिडीत तरुणीने केला आहे. तसेच पोलिसांनी यावेळी आपल्या गैरवर्तन करत शिवीगाळ सुद्धा केल्याचा आरोप पिडीतीने केला आहे. तसेच आरोपीला कठोर शिक्षा मिळावी अशी मागणीही या तरुणीने केली आहे.

Tags:    

Similar News