उदय सामंत हल्ल्याबाबत सुषमा अंधारेंचा गौप्यस्फोट

Update: 2022-08-03 14:00 GMT


शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर सुषमा अंधारे सक्रिय झालेल्या दिसत आहेत. यांनी पक्षप्रवक्तांच्या बैठकीनंतर त्या बोलत होत्या.उदय सामंत यांच्या हल्ल्याप्रकरणी विचारले असता"मेरी बिल्ली मेरे को म्याव"असा टोमणा त्यांनी उदय सामंत यांना लगावला आहे.त्याचबरोबर ज्यांच्यावर त्यांनी गुन्हा टाकला ते माझ्या सोबत स्टेजवर होते ,असे सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.

त्याचबरोबर उदय सामंतांची ही फक्त स्टंटबाजी आहे,असे स्पष्ट मत सुषमा अंधारे यांनी व्यक्त केले आहे.अब्दुल सत्तार यांच्या विषयी त्यांनी म्हंटल आहे कि ,"मी कसा शिंदे यांचा निष्ठावंत आणि प्रामाणिक आहे हे दाखवण्यासाठी हे सगळं सुरू आहे त्याचबरोबर मंत्री पदासाठी या घटना घडत असल्याचे सुषमा अंधारे यांनी म्हंटलं आहे.

Full View

Tags:    

Similar News