#Sushma andhare यांनी या दोन आमदारांच्या निलंबनाची केली मागणी

Update: 2022-08-17 06:10 GMT

शिंदे-भाजपचे सरकार बऱ्याच सत्ता संघर्षानंतर स्थापन झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचं हे पहिलं अधिवेशन आहे. या पावसाळी अधिवेशनातून शिंदे सेना विरुद्ध ठाकरे सेना असा वाद रंगताना तर दिसणार आहेच पण विरोधी पक्ष म्हणून वेगवेगळ्या विषयांवर चर्चा रंगणार असल्याचं दिसत आहे.

दरम्यान शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रकाश सुर्वे आणि संतोष बांगर यांच्या वर तीव्र टीका केली आहे . प्रकाश सुर्वे यांच्या विद्रोही वक्तव्याबद्दल तसेच संतोष बांगर यांनी अधिकाऱ्याची केलेली मारहाण अशा कृती जर विधिमंडळातीलच सदस्य करत असतील तर त्यांचे सदस्यत्व रद्द का करू नये,असा प्रश्न सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे. हा प्रकार धक्कादायक असल्याचं त्या म्हणतात त्याचबरोबर या सर्व घटनांवर मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री का बोलत नाही याचे आश्चर्य वाटत असल्याचं सुद्धा सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.गृहमंत्री अशा गोष्टींवर काहीच भाष्य करत नाहीत.महाराष्ट्रातील जनता तिरस्कार करण्याइतपत शिंदे सरकारने चुकीचे वागू नये,तसेच या दोन्ही आमदारांचे निलंबन झाले पाहिजे अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली आहे.

Tags:    

Similar News