#Soniya Gandhi : सोनिया गांधी माफी मागणार का?

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी सोनिया गांधींनी माफी मागावी अशी मागणी केली आहे.

Update: 2022-07-29 08:03 GMT



  काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांनी नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद गुरूवारी संसदेच्या दोन्ही सभागृहात उमटले. गेल्या काही दिवसांपासून महागाई, बेरोजगारी या मुद्द्यांवरुन संसदेचे कामकाज रोखून धरणाऱ्या काँग्रेसची अधीर रंजन चौधरी यांच्या वक्तव्यामुळे कोंडी झाली आहे.

   केंद्रीय मंत्री स्मृती इऱाणी यांनी लोकसभेत य़ाच मुद्द्यावरुन काँग्रेसवर जोरदार प्रहार केला. काँग्रेसने एका आदिवासी महिलेचा, राष्ट्रपतीपदाचा अपमान केला आहे, असा आरोप करत सोनिया गांधी यांनी यावर उत्तर द्यावे अशी मागणी केली. तर राज्यसभेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हाच मुद्दा उपस्थित करत जोरदार टीका केली. तसेच चौधरी यांनी माफी मागावी त्याचबरोबर सोनिया गांधींनी माफी मागावी अशी मागणी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि भाजप खासदारांनी केली आहे.

   दरम्यान काँग्रेसच्या संगीता तिवारी यांनी स्मृती इराणी आणि भाजपच्या मागणीचा तीव्र शब्दांत विरोध केला आहे ."स्मृती इराणी जे बोलतात ते चुकीचे आहे,अधीर रंजन चौधरी यांनी माफी मागितली आहे तरीपण तुम्ही सोनिया गांधींनी माफी मागावी म्हणत आहात,स्वतःचे गोवा प्रकरण लपवण्यासाठी हे सगळं करत आहात,आधी तू माफी माग सगळ्यांत मोठा गुन्हा तू केला आहेस.सोनिया गांधी माफी मागणार नाहीत,आधी तू माफी माग",या शब्दांत संगीता तिवारी यांनी तीव्र विरोध केला.

Full View


Tags:    

Similar News