यवतमाळमध्ये भाजप विरूध्द सेना संघर्ष इरेला, भाजपचे बॅनर शिवसैनिकांनी फाडले

सेनेच्या खा. भावना गवळींविरोधात भाजप ने टीकात्मक बॅनर लावले. जे आता शिवसैनिकांनी फाडले आहेत

Update: 2022-03-23 08:19 GMT

शिवसेनेकडूनजिल्ह्यात शिव संपर्क अभियान सुरू केले आहे. मात्र यवतमाळ - वाशीम मतदार संघाच्या खासदार भावना गवळी ह्या मागील सहा महिन्यापासून मतदार संघात फिरकल्या नाही. नागरिक यांनी कुणाकडे आपल्या अडचकणी मांडायच्या तसेच शिवसंपर्क या अभियानापासूनही त्या दूर आहेत. त्यामुळे भारतीय जनता पार्टी यवतमाळ जिल्हा यांच्याकडून 'खासदार भावना गवळी यांना दाखवा आणि बक्षीस मिळवा' असे बॅनर शहरातील एलआयसी चौकात लावण्यात आले. यामध्ये

"आपण सुरु केले शिवसंपर्क अभियान या निमित्ताने का होईना आम्हा मिळेल खासदारांच्या दर्शनाचा मान !!

एरव्ही त्यांचे आम्हास झाले दुर्लभ दर्शन: कंत्राटदार अन कारखानदारीत रमले त्यांचे मन !!

असे अभियान आपण बारमाही ध्याना! अडीअडचणी आम्ही मांडायच्या कुणाकडे?

समजून घ्या आमची भावना !

युगपुरुष मोदीचे करण्या हात बळकट; आम्ही यांना दिला होता मतरूपी आशीर्वाद !

खासदार हरविल्या आमच्या

कुठे मागायची आम्ही दाद

असे बॅनर लावून खासदार भावना गवळी यांना शोधून आणणाऱ्यास बक्षीस देण्याचे बॅनर लावण्यात आले.

शिवसेनेने लगोलग फाडले भाजपचे बॅनर



भारतीय जनता पक्षाने लावलेले बॅनर शिवसैनिकांनी फाडले. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील राजकारण पुन्हा पेटले आहे. खासदार भावना गवळी यांना दाखवा बक्षीस मिळवा असे बॅनर भाजपने लावले होते. खासदार भावना गवळी यांना समर्थन देत शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला.पाच महिन्यापासून खासदार दिसत नसल्याने भाजपने बॅनर लावले होते. शिवसंवाद यात्रा जिल्ह्यात आली असताना भाजप आणि सेनेत राजकारण तापल्याचे चित्र आहे.

Tags:    

Similar News