शिवसेना मनसे कार्यकर्ते भिडले..

Update: 2022-06-12 09:37 GMT

राज्यसभेच्या सहा जागांसाठी महाराष्ट्रात मतदान झाले. या अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत सहाव्या जागेसाठी भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवारांमध्ये चांगलीच लढत रंगली होती. या लढतीत भाजपच्या धनंजय महाडिक यांनी शिवसेनेच्या संजय पवार यांचा दोन मतांनी पराभव केला आणि या निवडणुकीत बाजी मारली. या सगळ्या घडामोडी घडल्यानंतर मनसे नेते अमेय खोपकर यांनी शिवसेनेला व उद्धव ठाकरे यांना ट्रोल केलं आहे..

संभाजीनगर येथे झालेल्या उद्धव ठाकरे यांनी त्याच्या भाषणात एक वाक्य म्हटलं होतं त्याच वाक्याचा आधार घेत अमेय खोपकर यांनी एक फोटो शेअर केला आहे. उद्धव ठाकरे औरंगाबादच्या सभेत म्हणाले होते की, "संभाजीनगरचे नाव बदलायची गरज काय, मी म्हणतो ना संभाजीनगर..मग झालं" आता अमेय खोपकर यांनी जे ट्विट केला आहे त्यामध्ये त्यांनी उद्धव ठाकरे व संजय पवार यांचा फोटो शेअर करत त्यावरती लिहिले आहे की, "मी म्हणतोय ना तुला खासदार मग जिंकायची गरज काय.. आज पासून तू खासदार" अशाप्रकारे मनसेकडून शिवसेनेला ट्रोल केले जातं आहे.

आता हा सगळा प्रकार घडत असताना शिवसेना गप्प बसणार कशी तर शिवसेनेच्या नेत्यांनी सुद्धा आता मनसेला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. शिवसेनेच्या नेत्या अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी ट्विट केले आहे, यामध्ये त्यांनी राज ठाकरेंना खोचक टोला लगावला आहे. त्यांनी म्हंटलं आहे की, "आम्ही म्हणतो ना तुम्हाला स्वयंघोषित हिंदूजननायक मग आयोध्याला जायची गरज काय आहे. आज पासून तुम्ही स्वयंघोषित हिंदूजननायक!

तर समाज माध्यमांवर अशाप्रकारे शिवसेना आणि मनसे कार्यकर्ते एकमेकांवर तुटून पडले आहेत. या दोघांमध्ये सोशल मीडियावर वाक्युद्ध सुरू आहे. मनसे नेते शिवसेना प्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत आहेत तर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर टीका सुरू आहे.

Tags:    

Similar News