शिंदेंच्या विरोधात ठाण्यात शिवसेनेची एकटी महिला..?

Update: 2022-07-08 09:17 GMT

राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वीच शपथ घेतली. हा दिवस येण्याअगोदर काही दिवस राज्याच्या राजकारणात अगदी नाट्यमय परिस्थिती होती. राज्याच्या राजकारणात नक्की काय घडतंय याचा सुगोवा भल्याभल्या राजकीय विश्लेषकांना सुद्धा आला नाही. शिंदे यांनी शिवसेनेत उभी फूट पाडत आपल्या सोबत सेनेचे चाळीसहुन अधिक आमदार नेले. या सगळ्या घडामोडी झाल्यानंतर आता शिवसेनेचे खासदार फुटणार असल्याची चर्च तर आहेच. इतकंच नाही तर त्याच सोबत स्थनिक नगरसेवक देखील आता शिंदे गटात सामील होताना पाहायला मिळतं आहेत. कालच ठाणे व नवी मुंबई येथील अनेक माजी नगरसेवकांनी शिंदे गटाचे समर्थन करण्याचा निर्णय घेतला व ठाण्यातील जवळपास ६६ तर नवी मुंबई महानगरपालिकेतील २८ माजी नगरसेवकांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला. आता हे होत असताना शिंदे यांचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या ठाण्यात उद्धव ठाकरेंच्या पाठीशी कोण उभं राहणार कि नाही? याची चर्चा चालू आहे. एकीकडे हि चर्चा चालू असताना आता एका महिलेचं नाव समोर येत आहे. ते नाव म्हणजे खासदार राजन विचारे यांच्या पत्नी माजी नगरसेविका नंदिनी विचारे यांचे.

काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन अनेक आजी- माजी नगरसेवकांनी भेट घेत त्यांचा सत्कार केला. यावेळी नंदिनी विचारे या ठिकाणी न आल्याने आता नवीन चर्चा सुरु झाली आहे. त्या शिंदे गटात सामील न होता शिवसेनेत उद्धव ठाकरेंच्या पाठीशी उभ्या राहणार असल्याचे म्हंटल जात आहे. त्यामुळे समाजमाध्यमांवर शिंदेंच्या बालेकिल्ल्यात हि महिला शिवसैनिक एकनाथ शिंदे यांच्या विरोधात दंड थोपटून उभी राहणार अशी चर्चा सुरु आहे.

Tags:    

Similar News