Serum institute Fire : आमदार मुक्ता टिळक व्यक्त केला घातपाताचा संशय

आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसताना भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांनी या आगीमागे घातपाताची शक्यता वर्तविली आहे.

Update: 2021-01-21 13:30 GMT

पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीला आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास आग लागली. त्यातच आता पुण्यातील भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांनी 'या आगीमागे घातपाताची शक्यता आहे का?' असा संशय व्यक्त केला आहे. त्यांच्या या शंकेमुळे आता या संपूर्ण घटनेला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे.

काय म्हणाल्या आमदार मुक्ता टिळक?..

"हा घातपाताचा प्रकार वाटतोय, प्रथमदर्शनी असं वाटतंय. कारण ज्याठिकाणी आग लागलीय, त्या परिसरात कोरोना लस बनवण्याचं काम सुरु आहे. हा घातपाताचा प्रकार वाटतोय ही माझी शंका आहे" असं मुक्ता टिळक म्हणाल्या.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सीरम इन्स्टिट्यूट खूपच चर्चेत आहे. कारण कोरोनासारख्या साथीच्या आजारावर याच इन्स्टिट्यूटने लस शोधून काढली आहे. तसेच देशात लसीकरण देखील सुरु झालं आहे. त्यामुळे येथे लागलेल्या आगीने अनेकांना धक्का बसला आहे.

Tags:    

Similar News