"सदरचा खून हा सचिन वाझे याने केला असावा, असा माझा संशय आहे"

"सदरचा खून हा सचिन वाझे याने केला असावा, असा माझा संशय आहे" असा जबाब मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमला हिरेन यांनी नोंदवला आहे.

Update: 2021-03-09 10:30 GMT

मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनीच केला असल्याचा गंभीर आरोप हिरेन यांच्या पत्नीने केला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत हिरेन यांच्या पत्नीने पोलिसांकडे दिलेल्या जबाब वाचून दाखवला. तसेच सचिन हिरेन यांना अटक करण्याची मागणी केली आहे. मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांसह जी गाडी सापडली होती ती गाडी मनसुख हिरेन यांची होती.

या मुद्दा विरोधी पक्षनेत्यांनी सभागृहात उपस्थित केल्यानंतर दोन ते तीन तासांनी हिरेन यांचा मृतदेह ठाण्याच्या खाडीत आढळून आला होता. त्यानंतर सरकारने या प्रकरणाचा तपास एटीएसकडे दिला होता. पण आता हिरेन यांच्या पत्नीने दिलेल्या जबाबानुसार सचिन वाझे यांनी हिरेन यांची तिच गाडी ४ महिने वापरली होती. त्यानंतर ५ फेब्रुवारी रोजी गाडी परत केली होती. तसेच गाडीत स्फोटकं सापडल्यानंतर सचिन वाझे हे आपल्या पतीच्या संपर्कात होते, अशीही माहिती त्यांनी आपल्या जबाबात दिली आहे.

यानंतर मंत्री अनिल परब यांनी खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्या प्रकरणी विरोधक आवाज का उचलत नाहीत, असा जाब विचारत भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न केला.

Tags:    

Similar News