रुपाली चाकणकरांची महिला प्रदेशाध्यक्षपदी निवड...

Update: 2023-07-03 12:07 GMT

राज्य महिला आयोगाचे अध्यक्षा रूपाली चाकणकर या अजित पवार यांच्यासोबत जाणार की शरद पवार यांच्यासोबत जाणार याविषयी अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला होता. आता रुपाली चाकणकर यांची भूमिका स्पष्ट झाली आहे. रूपाली चाकणकर यांनी अजित पवार यांना समर्थन दिले असून पक्षाचे नवे प्रदेशाध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी रूपाली चाकणकर यांची महिला प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे..

राज्याच्या राजकारणात कधी काय घडेल याचा अंदाज आता राजकीय विश्लेषक सुद्धा बांधू शकत नाही आहेत. राज्यात वारंवार राजकीय नाट्य पाहायला मिळत आहे. अशाच प्रकारचे नवीन राजकीय नाट्य काल आपल्या सर्वांना पाहायला मिळालं. आपणा सर्वांना माहित आहे तीन वर्षांपूर्वी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होतं. या महाविकास आघाडीमधील शिवसेना पक्षात फूट पडली आणि एकनाथ शिंदे यांनी आमदारांचा मोठा गट घेऊन भाजपसोबत सरकार स्थापन केलं. त्यानंतर या शिंदे-फडणवीस सरकारला एक वर्ष पूर्ण होतात न होतात तोपर्यंत पुन्हा एकदा राज्यात राजकीय भूकंप पाहायला मिळाला.

काल राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी आपल्या काही सहकाऱ्यांसोबत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला व ९ लोकांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. आता अजित पवार व त्यांच्यासोबत गेलेल्या सहकाऱ्यांच्या निर्णयानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर या नक्की काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलं होते. हा सर्व प्रकार घडल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार या दोन्ही नेत्यांच्या संपर्कात अनेक जण असल्याचे म्हटलं जात आहे तसे दावे त्यांच्याकडून केले जात आहेत. आज जर पाहिलं तर सकाळपासून अजित पवार यांना अभिनंदन करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. तर दुसरीकडे शरद पवार यांच्या कराड आणि सातारा दौऱ्याला देखील लोकांनी मोठा प्रतिसाद दिला आहे.

ज्याप्रमाणे शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे असे दोन वेगवेगळे गट निर्माण झाले त्याचप्रमाणे आता राष्ट्रवादीत सुद्धा दोन गट निर्माण झाले आहेत. त्यामुळे कुठला नेता कुणासोबत जाणार याची देखील जनतेला मोठी उत्सुकता आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी आज अजित पवारांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली.  आहेत. त्या आता चालू असलेल्या अजित पवारांच्या पत्रकार परिषदेला सुद्धा हजर होत्या. याच पत्रकार परिषदेत पक्षाचे नवे प्रदेशाध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी रूपाली चाकणकर यांची महिला प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे..

Tags:    

Similar News