UP Election 2022: विधानसभा निवडणुकीच्या युतीबाबत प्रियंका गांधींचं मोठ विधान

Update: 2021-07-18 12:54 GMT

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात (up election 2022 ) कॉंग्रेस स्वबळावर उतरणार की युती करणार याविषयी अनेक दिवसांपासून चर्चा सुरु आहे. मात्र यावर आता कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधींनी (priyanka gandhi) प्रतिक्रिया दिली असून, 'यावेळी यावर बोलणे उचित ठरणार नाही म्हणत त्यांनी युती होणार नाही याला नकार दिला नाही. त्यामुळे आता पुन्हा युतीच्या चर्चेला वेग आला आहे.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या युतीच्या प्रश्नाला उत्तर देताना प्रियंका गांधी म्हणाल्या, 'आगामी निवडणुकांबाबत आमचा विचार व्यापक आहे. पण आता काही बोलणं खूप घाईच होईल. मात्र, या निवडणुकीत आम्ही युती करणार की नाही हे मी नाकारत नाही, पण याबद्दल आत्ताच बोलणे योग्य होणार नाही, असेही प्रियंका गांधी म्हणाल्यात.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस युतीसाठीचाचपणी करत असल्याची चर्चा आहे. तसेच समाजवादी पार्टीसोबतच इतर छोट्या-छोट्या संघटनांना सुद्धा सोबत घेण्याच्या पर्यायाबाबत सुद्धा कॉंग्रेस विचारात असल्याचे सुद्धा बोलले जात आहे. विशेष म्हणजे युतीबाबतचा सल्ला राजकीय सल्लागार प्रशांत किशोर यांनी दिला असल्याच सुद्धा बोलले जात आहे.

प्रियंका गांधी असणारा कॉंग्रेसचा चेहरा...

उत्तरप्रदेशमध्ये कॉंग्रेसकडून मुख्य चेहरा प्रियंका गांधीच असणार आहे. कारण भाजपची उत्तरप्रदेशमध्ये सत्ता आल्यापासून प्रियंका गांधी विविध मुद्यांवरून आक्रमक होताना पाहायला मिळाल्यात. महिला अत्याचार घटना असोत की कोरोनाचा मुद्दा असो, प्रत्येक वेळी योगी सरकारला अडचणीत आणण्याचा काम प्रियंका गांधी यांनी केलं आहे. तसेच त्यांचे अनेक आंदोलन सुद्धा उत्तरप्रदेशमध्येच होत असतात. त्यामुळे आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात प्रियंका गांधी पक्षाची कमान सांभाळनार असल्याची चर्चा आहे.

Tags:    

Similar News