"हिम्मत असेल तर..."; भाजपला प्रणिती शिंदेचं ओपन चॅलेंज

Update: 2021-07-27 05:38 GMT

उजनी धरणाच्या पाण्यावर सोलापूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण नेहमीच चर्चेत असते. विशेष करून भाजप आणि कॉंग्रेसमध्ये ह्या मुद्यावरून नेहमीच आरोप प्रत्यारोप होताना पाहायला मिळतात. आता पुन्हा ह्याच मुद्यावरून सोलापूर जिल्ह्याचे स्थानिक राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. कारण, कॉंग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी 'हिम्मत असेल तर उजनीवरून दुसरी जलवाहिनी करून दाखवा' असे ओपन चॅलेंज भाजपला दिले आहे.

'कॉंग्रेस मनामनात,कॉंग्रेस घराघरात' या मोहिमेचा काल सोलापुरातील उत्तर कसबा परिसरात शुभारंभ झाला. यावेळी बोलताना आमदार प्रणिती शिंदे यांनी महापालिकेतील सत्ताधारी भाजपवर जोरदार टीका केली. "भाजपकडून सातत्याने केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यावर टीका केली जाते. परंतु, शिंदे यांनी काय केले, केवळ उजनीचे पाणी आणले?, उजनी, उजनी काय करताय, आहे का तुमच्यात हिम्मत दुसरी पाईपलाईन आणण्याची असा सवाल शिंदे यांनी उपस्थित केला.

Full View

पुढे बोलताना त्या म्हणाल्यात की, "किती वर्षे आम्ही दुहेरी पाईपलाईनचे नाव ऐकतो. त्यांचे दोन मंत्री, एक खासदार असतानाही त्यांना ते जमले नाही. भाजपला मी चॅलेंज करते, केंद्रात त्यांची सत्ता असून मोदीबाबा पंतप्रधान आहेत. त्यांच्या माध्यमातून त्यांनी हे काम पूर्ण करून दाखवावे, असे आव्हानही प्रणिती शिंदे यांनी भाजप नेत्यांना दिले.

Tags:    

Similar News