"व्यवस्थित चौकशी नाही केली तर मी पोलीसांविरोधात तक्रार दाखल करणार"

पूजा चव्हाण मृत्यु प्रकरणात पूजाच्या आजीने केली पहिली तक्रार दाखल

Update: 2021-02-28 13:00 GMT

टिकटॉक स्टार पूजा चव्हाण मृत्यु प्रकरणी त्यांच्या आजीने पुण्यातील वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत संजय राठोड यांच्या नावाचाही उल्लेख केल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेत सांगीतलं. पूजाची आजी शांताताई राठोड यांनी सामाजीक कार्यकर्त्या तृप्ती देसाईंच्या मदतीने ही तक्रार दाखल केली आहे.

शांताताई राठोड म्हणाल्या की, "जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत वानवडी पोलीस ठाण्यातून बाहेर पडणार नाही. या तक्रारीत मी संजय राठोड यांचेही नाव टाकणार आहे. विजय म्हणत होता पोस्टमार्टम होऊ देऊ नका, पोस्टमार्टम रिपोर्ट कुठे गेला, फक्त मृत्यू झाला म्हणून नोंद आहे. कितीही पळवाट काढली तरी काहीही होणार नाही. आता पुढे आले नाहीतर आमच्या समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होईल." असं शांताताई राठोड यांनी म्हटलं आहे.

Tags:    

Similar News