"पूजा चव्हाण मृत्यु प्रकरणी भाजपने बंजारा समाजाची बदनामी केली"

पूजा चव्हाण प्रकरणात बंजारा समाजाची बदनामी होत असल्याची तक्रार राष्ट्रीय बंजारा परिषदेने वाशीम जिल्ह्यातील मानोरा पोलिस ठाण्यात केली आहे. या तक्रारित विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, चित्रा वाघ, सुधीर मुनगंटीवर यांच्यासह इतर चार नेत्यांचा समावेश आहे..

Update: 2021-03-03 12:30 GMT

पूजा चव्हाण मृत्यु प्रकरणी संजय राठोड यांना आपल्या वनमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. आता या प्रकरणात बंजारा समाजाची बदनामी होत असल्याची तक्रार राज्यात दोन ठिकाणी दाखल करण्यात आली आहे. पुण्यातील वानवडी पोलीस ठाणे व वाशीम जिल्ह्यातील मानोरा पोलिस ठाण्यात या तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.

पुण्यात अॅड. रमेश खेमू राठोड यांनी पोस्टाद्वारे एक अर्ज करुन ही तक्रार केली आहे. तर राष्ट्रीय बंजारा परिषदेचे युवा जिल्हाध्यक्ष श्याम सरदार राठोड यांनी वाशीम जिल्ह्यातील मानोरा पोलिस ठाण्यात या तक्रारी दाखल केली आहे.

या तक्रारीत पूजाच्या परिवारासह बंजारा समाजाची बदनामी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलिस पूजा चव्हाण प्रकरणाचा तपास करीत आहेत. परंतु भाजपचे नेते तपास करणाऱ्या पोलिसांवर दबाव आणत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे संबंधित भाजप नेत्यांसह प्रसार माध्यमांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी या तक्रारीत केली आहे.

भाजपच्या या सात नेत्यांविरोधात तक्रार दाखल..

बंजारा समाजाने दाखल केलेल्या तक्रारीत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजप आमदार अतुल भातखळकर, भाजपच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ, आमदार आशिष शेलार, माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार प्रसाद लाड यांच्या नावाचा समावेश आहे.

Tags:    

Similar News