मोठा नेता नेहमी त्याग करतो, ज्या दिवशी वाटेल तेव्हा निर्णय घेऊ; भाजप नेतृत्वाला पंकजा मुंडेंचा सूचक इशारा

Update: 2021-07-13 09:13 GMT

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात बीडच्या खासदार प्रितीम मुंडे (pritam munde) यांना संधी न मिळाल्याने मुंडे भगिनी नाराज असल्याचं बोलले जात होते. त्यातच मुंडे समर्थकांकडून राजीनामा सत्र काही थांबायला तयार नव्हते. यासर्व घडामोडींवर आज पंकजा मुंडे ( pankaja munde ) काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र आपण नाराज नसून, सर्व कार्यकर्त्यांचे राजीनामे नामंजूर करत असल्याची घोषणा पंकजा मुंडे यांनी केली आहे. तसेच मोठा नेता नेहमी त्याग करतो, असेही त्या म्हणाल्यात.

यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्यात, मला सत्तेची लालसा नाही, मला खर्ची नको. मला संपवण्याचा प्रयत्न केला गेला. माझ्याबाबतीत बातम्या पेरण्यात आल्या, पण मी कुणाला घाबरत नाही. मोठा नेता नेहमी त्याग करतो असेही पंकजा मुंडे म्हणाल्यात.

तसेच आपण नाराज नसून, आपलं घर का सोडायचा असा प्रश्न सुद्धा पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना उपस्थिती केला. तसेच ज्या दिवशी वाटेल तेव्हा निर्णय घेऊ, मला जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत मी धर्मयुद्ध टाळत राहीन असं म्हणत पंकजा यांनी भाजप नेतृत्वालाही सूचक इशारा दिला आहे.

Tags:    

Similar News