पंकजा मुंडेंना पत्रकरांनी विचारलं शिवसेनेत जाणार का?,त्यावर 'पंकजाताई' म्हणल्यात...

Update: 2021-07-29 09:32 GMT

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी परळीत पूरबाधितांसाठी मदत फेरी काढली. राज्यात झालेल्या मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका कोकणाला बसला.त्यांच्या मदतीसाठी ही फेरी काढल्याचे मुंडे यांनी सांगितलं

बीड // भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी परळीत पूरबाधितांसाठी मदत फेरी काढली. राज्यात झालेल्या मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका कोकणाला बसला. अनेकांचे संसार- प्रपंच महापुरात वाहून गेला आहे. अनेक कुटुंबं उद्ध्वस्त झाली आहेत. सरकार- प्रशासनाकडून त्यांना मदत मिळेलच, पण आपणही त्यांना मदत केली पाहिजे या भावनेतून ही मदत फेरी काढल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितलं.

दरम्यान पंकजा मुंडे यांना शिवसेनेत जाण्याबाबत पत्रकारांनी विचारले असता, सध्या खूप परिस्थिती गंभीर आहे. आता सगळं शिवसेना-भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस असं काही नाही, आता राज्यावर आलेलं संकट आणि त्यासाठी समर्पण हे महत्त्वाचं आहे. असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

मुंडे प्रतिष्ठानतर्फे पूरग्रस्तांना मदत

राज्यावर देशावर आलेल्या प्रत्येक संकटावेळी मुंडे प्रतिष्ठानतर्फे मदत करत असते. वाढदिवस साजरा करणं मुंडे साहेबांना मान्य नव्हतं. त्यामुळे मी कार्यकर्त्यांना विनंती केली होती माझ्या वाढदिवसाला सोहळा नको. त्यापेक्षा पूरग्रस्तांसाठी मदत फेरी करूयात. कार्यकर्त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत मदत फेरी काढली त्याबद्दल त्यांचं कौतुक आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

मी पूरग्रस्त भागाचा दौरा करणार नाही, मदत मात्र पाठवणार

मी पूरग्रस्त भागाचा दौरा करणार नाही मात्र, पूरग्रस्तांसाठी मदत गोळा करून त्यांच्यापर्यंत ती पोहोचवेळ असं मुंडे म्हणाल्या. पूरग्रस्त भागाचा दौरा करण्यापेक्षा तिथे मदत पोहोचवणं अधिक महत्वाचं असल्याचे पंकजा मुंडेंनी सांगितलं.

Tags:    

Similar News