केंद्रीय क्रीडा मंत्र्यांच्या उपस्थितीत ऑनलाईन परिषदेचे आयोजन; अदिती तटकरेंची उपस्थिती

Update: 2021-09-21 03:19 GMT

केंद्रीय क्रिडा मंत्री अनुरागजी ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांच्या क्रिडा मंत्र्यांचा उपस्थितीत ऑनलाईन परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र राज्याची क्रीडा राज्यमंत्री नात्याने अदिती तटकरे यांनी या चर्चासत्रात सहभाग घेतला. यावेळी विवध मुद्यांसह ग्रामिण क्रिडा गुणांना राष्ट्र-आंतरराष्ट्रीय पातळीवर आणण्यासाठी राज्यनिहाय सविस्तर चर्चा करण्यात आली.

विविध खेळांमध्ये राष्ट्र अग्रस्थानी यावे, यासाठी खेलो इंडिया योजनेंतर्गत केंद्राची स्थापना करुन क्रिडा विषयी प्रचार, आवड व क्रिडागुणांना वाव मिळण्यासाठी देशात विविध क्रिडा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे. स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडिया, रोख पारितोषिके, फीट इंडिया चळवळ, ऑनलाईन ट्रेनिंग व प्रशिक्षण कार्यक्रम आदीतून ग्रामिण क्रिडा गुणांना राष्ट्र-आंतरराष्ट्रीय पातळीवर आणण्यासाठी राज्यनिहाय सविस्तर चर्चा यावेळी करण्यात आली.

तर, महाराष्ट्र राज्याने खेलो इंडिया अंतर्गत केंद्रास सादर केलेले विविध प्रस्ताव केंद्रामार्फत मंजूर करण्यात यावे, अशी मागणी यावेळी दिती तटकररे यांनी केली. देशातील पहिल्या आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिडा विद्यापीठाची स्थापना, गो-गर्ल-गो च्या माध्यमातून मुलींना क्रिडाविषयक अधिक प्रोत्साहन देण्यासाठी विभागामार्फत केले जाणारे प्रयत्न आदी विषय यावेळी अदिती तटकरे यांनी यावेळी मांडले.

Tags:    

Similar News