मोदीसाहेब आता आदिमानवासारखं पानं फुलं खाऊन जगायचं का?

गॅस सिलेंडरच्या वाढत्या किंमतीवरुन राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांचा पंतप्रधानांना सवाल

Update: 2021-03-01 11:45 GMT

गॅस सिलेंडरच्या वाढत्या किंमतीवरुन राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी मोदीसाहेब आम्ही आता आदिमानवासारखं पानं फुलं खाऊन जगायचं का? असा प्रश्न विचारला आहे.

मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी घरगुत वापरातील गॅस सिलेंडरच्या किंमतीत 25 रुपयांनी वाढ करण्यात आली. रुपाली चाकणकर म्हणाल्या की, "फेब्रुवारी महिन्यामध्ये तब्बल 3 वेळा गॅस सिलेंडर च्या किंमती मध्ये वाढ झाली ही अनुक्रमे 25,50,25 इतकी वाढवली गेली. स्वातंत्र्यनंतर च्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिन्यात इतकी वाढ केली. हे कमी होते म्हणून की काय आज 1 मार्च रोजी पुन्हा 25 रुपयांनी गॅस दर वाढ सन्माननीय पंतप्रधान मोदीसाहेबांनी केली आहे. पंतप्रधान मोदीसाहेब ,आपण देशावर अशी वेळ आणली आहे की आता 'अश्यमयुगात' सुद्धा नको तर मानवाची उत्पत्ती ज्याच्या पासून झाली त्या "माकडवस्थेत" जाऊन झाडावरची पान फुल खाऊन जगावं की काय...?"

दरम्यान, चार दिवसांपूर्वी म्हणजेच 25 फेब्रुवारीला एलपीजी गॅसच्या किंमतीत २५ रुपयांची वाढ झाली होती.


Tags:    

Similar News