योगी राज्यातील भोगींचा सुळसुळाट भाजपच्या महिला नेत्याला दिसत नाहीये का?; चाकणकर

Update: 2021-07-10 15:42 GMT

मुंबई : उत्तरप्रदेश येथे महिला अत्याचाराच्या घटना काही थांबायला तयार नाही. दोन दिवसांपूर्वी चंदौली जिल्ह्यातील बर्थरा गावात दलित महिलेच्या घराला आग लावली होती. त्यांनतर आता महिलेची भर रस्त्यात साडी ओढली जात असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी भाजप महिल्या नेत्यांवर निशाणा साधला आहे.

चाकणकर यांनी ट्विट करत म्हंटले आहे की,योगीच्या राज्यात सुरू असलेला भोगींचा सुळसुळाट भाजपच्या एकाही महिला नेत्याला दिसत नाहीये का?,असा टोला त्यांनी भाजपच्या महिला नेत्यांना लगावला आहे.


पुढे बोलताना चाकणकर म्हणाल्या, 'ज्याला लोक "रामराज्य" समजतात ते खरं तर "रामभरोसे" राज्य आहे. रामभरोसे राज्यात असलेल्या आंधळ्या सरकारमुळे तिथे कायदा आणि सुव्यवस्था नावालाही शिल्लक नाही. सीतेची ही हतबलता तिथे रोजचीच आहे,असा खोचक टोला त्यांनी भाजपला लगावला आहे.

Tags:    

Similar News