मुंडे समर्थकांची आज बैठक; 'पंकजा' ताई काय निर्णय घेणार...

Update: 2021-07-13 02:13 GMT

courtesy social media

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात बीडच्या खासदार प्रितीम मुंडे (pritam munde) यांना संधी न मिळाल्याने मुंडे भगिनी नाराज असल्याचं बोलले जात आहे. त्यातच मुंडे समर्थकांच राजीनामा सत्र काही थांबायला तयार नाही. यासर्व घडामोडींवर आज पंकजा मुंडे ( pankaja munde ) यांच्याकडून खुलासा केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पंकजा मुंडे ( pankaja munde ) काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नाराज पंकजा मुंडे ( pankaja munde ) यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) यांची सुद्धा भेट घेतली आहे. त्यानंतर सुद्धा त्यांनी आपली भूमिका मांडली नाही. मात्र आज मुंबईत पंकजा ह्या आपल्या समर्थकांची बैठक घेणार आहे. या बैठकीनंतर त्या माध्यामांशी सवांद साधणार असल्याचे बोलले जात आहे.

राजीनामा सत्र सुरूच...

बीड जिल्ह्यातील अनेक पदाधिकाऱ्यांनी आतपर्यंत राजीनामे दिले आहे. तर अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी-शेगाव येथे मुंडे समर्थकांनी राजीनामा दिल्याने भाजपात खळबळ माजली आहे. पाथर्डी-शेगावमधील पंचायत समितीच्या सभापती सुनील दौड, नगराध्यक्ष डॉ. मृत्यूंजय गर्जे, उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, धनंजय बडे यांच्यासह २५ भाजपा पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत.

Tags:    

Similar News