100 कोटी वसुली प्रकरणात मुख्यमंत्र्यांचा हात, लोकसभेत खासदार नवनीत राणा यांचा आरोप

Update: 2021-03-22 08:30 GMT

माजी मुंबईं पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांच्या लेटरमुळे राज्यात राजकीय वादळ आलं आहे. विरोधी पक्षान राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी केलेय. तर दुसरीकडे हे खंडणी प्रकरण लोकसभेत चर्चेला आल्याले गदारोळ झाला.

संसदेत बोलताना खासदार नवनीत राणा म्हणाल्या की, "जो व्यक्ती सोळा वर्ष निलंबित होता. त्याला पुन्हा सेवेत का घेतलं? कुणी घेतलं?, याची चौकशी करण्यात यावी. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी सचिन वाझे यांना पोलीस दलात घ्यायला नकार दिला होता. शिवसेनेने वाझेंसाठी फडणवीसांवर दबाव आणला होता. हा प्रकार असाच सुरू राहिला तर संपूर्ण देशात खंडणी वसुलीचा पायंडा पडेल. मला सांगायचं आहे की महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरुनच हे सगळं सुरु आहे. बदल्या करणं, खंडणी वसुल करणं यामध्ये इतर कोणीही सहभागी नाही."

असा थेट आरोप राणा यांनी मुख्यमंत्र्यांवर केला आहे.

Full View


Tags:    

Similar News