''किती लोक उरले..'' मनसेची शिवसेनेवर बोचरी टीका...

Update: 2022-07-09 06:17 GMT

शिवसेनेत झालेल्या बंडानंतर पक्ष्यात मोठी खिंडारी पडली असल्याचं म्हंटल जात आहे. कारण एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे ४० हुन अधिक आमदार आपल्या सोबत नेत भाजप सोबत सत्ता स्थापन केली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या बंडानंतर सर्व बंडखोर आमदारांनी उद्धव ठाकरे आम्हाला वेळच देत नाहीत अशी टीका केली. त्यानंतर शिवसेना चांगलीच ऍक्टिव्ह झालेली आपल्याला पाहायला मिळाली. स्वतः उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाधीकार्यांच्या मीटिंग घेत त्यांचं म्हणणे ऐकून घेतलं. या सगळ्यामध्ये आदित्य ठाकरेंनी पण अनेक ठिकाणी जाऊन कार्यकर्ते व पदादिकार्यांना भेटून त्यांच्याशी संवाद साधत मेळावे घेतेले. यानंतर आता आदित्य ठाकरे यांनी निष्ठा यंत्राचे आयोजन केले आहे. सुरवातीला मुंबई व नंतर राज्यभर ते या निष्टा यात्रेच्या माध्यमातून कार्यकर्यांनिशी संवाद व सर्व शाखांना भेटी देणार आहेत. त्यांच्या याच निष्ठा यात्रेवरून मनसेच्या नेत्या शालिनी ठाकरे यांनी पक्षात किती लोक उरले आहेत तपासून पाहण्यासाठी आदित्य ठाकरे हा दौरा करत असल्याची बोचरी टीका केली आहे.

आदित्य ठाकरे या निष्ठा मेळाव्याची सुरवात भायखळ्यातील बंडखोर आमदार यामिनी जाधव यांच्या मतदारसंघातून करणार आहेत. या निष्ठा यात्रेवरून मनसेने आदित्य आदित्य ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. शालिनी ठाकरे यांनी ट्विट करत म्हंटले आहे कि, ''आदित्य ठाकरेंची निष्ठा यात्रा हा तर एक बहाना आहे, पक्षात किती लोक उरले आहेत ते कदाचित तपासून पाहत आहेत.....!!! आणि म्हणे मी संपलेल्या पक्षावर बोलत नाही....... समय समय की बात है.....!!!''

Tags:    

Similar News