''अजुनही वेळ गेलेली नाही....'' शिवसेना नेत्याचे ट्विट

Update: 2022-07-20 07:53 GMT

आमदार खासदारांना शिवसेना पक्ष मागायला कोर्टात जाण्याची गरज लागणार नाही, आदरणीय उद्धव साहेब आणि आदरणीय शिंदे साहेबांनी चर्चा केली तर मार्ग निघेल असं आत दीपाली यासययद यांनी म्हंटल आहे

राज्यातील सत्तासंघर्षाच्या पेचात सुप्रीम कोर्टातील सुनावणीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. पण आज बुधवारी झालेल्या सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्टात पेच कायम राहिला आहे. पण या प्रकरणात अनेक घटनात्मक मुद्दे निर्माण झाले असल्याने हे प्रकरण मोठ्या घटनापीठाकडे वर्ग करावे, असे आपल्याला वाटते, असे मत सरन्यायाधीस एस.व्ही.रमणा यांनी व्यक्त केले. तसेच या प्रकरणाची सुनावणी १ ऑगस्ट रोजी ठेवण्यात आली आहे. तोपर्यंत दोन्ही बाजूंनी आपले म्हणणे लिखित स्वरुपात सादर कऱण्याचे आदेशही कोर्टाने दिले आहेत. हे सगळं होत असताना शिवसेनेच्या नेत्या अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी ''आणूनही वेळ गेलेली नाही, आमदार खासदारांना शिवसेना पक्ष मागायला कोर्टात जाण्याची गरज नाही'' असं ट्विट करून म्हंटल आहे.

दीपाली सय्यद मागील अनेक दिवसांपासून ठाकरे-शिंदे यांनी पुन्हा एकत्र यावे यासाठी प्रयत्न करत आहेत. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सुद्धा भेट घेत. त्यानंतर पुढील दोन दिवसं या दोघांची भेट होणार असल्याचं त्यांनी म्हंटल होतं. त्यानंतर त्यांनी केलेल्या या विधानावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी त्यांना चांगलेच खडे बोल सुनावले होते. हे सगळं झालं असलं तरी दीपाली सय्यद या शिंदे व ठाकरेंना एकत्र आणण्यासाठी मध्यस्थी करण्याकरीत वारंवार प्रयत्न करताना दिसत आहेत. आता त्यांनी आज पुन्हा ट्विट करत बंडखोर आमदार, खासदारांना अजून वेळ गेली नसल्याचं सांगितले आहे. त्यांनी ट्विट करत म्हंटले आहे की, अजुनही वेळ गेलेली नाही, आमदार खासदारांना शिवसेना पक्ष मागायला कोर्टात जाण्याची गरज लागणार नाही, आदरणीय उद्धव साहेब आणि आदरणीय शिंदे साहेबांनी चर्चा केली तर मार्ग निघेल, याची जबाबदारी दोन्ही बाजुने झाली तर विजय शिवसेनेचाच होईल. जय महाराष्ट्र

आमदार खासदारांना शिवसेना पक्ष मागायला कोर्टात जाण्याची गरज लागणार नाही, आदरणीय उद्धव साहेब आणि आदरणीय शिंदे साहेबांनी चर्चा केली तर मार्ग निघेल असं आत दीपाली सय्यद यांनी म्हंटल आहे. आता पुढे नक्की काय होत पाहावे लागणार आहे..

Tags:    

Similar News