"गद्दारांच सरकार" यांच्याकडून काय अपेक्षा करणार ? : मनिषा कायंदे

Update: 2022-08-17 06:36 GMT

आज पावसाळी आधिवेशनाचा पहिलाच दिवस आहे. यातच विरोधी पक्ष आता आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत. काल पालघर मध्ये रस्त्याअभावि अदिवासी पाड्यातील दोन नवजात बालक दगावली. त्याप्रमाणे मागील काही दिवसात भंडारा जिल्ह्यात घडलेल्या बलात्काराच्या प्रकरणावर शिवसेना प्रवक्ते, आमदार मनिषा कायंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

भंडारा जिल्ह्यात एका ३० वर्षीय महिलेवर बलात्कार झाला होता. याची दखल वेळेवर घेतली नसल्याने तीला पुन्हा त्याच प्रकाराला सामोरे जावं लागल. यावर प्रतिक्रीया देताना आमदार मनिषा कांयदे म्हणाल्या "भंडारा-गोंदीया जो प्रकार घडला तो निषेधार्ह आहे. त्या प्रकरणी अजून कोणालाही शिक्षा झाली नाही". आरोपी आजून पकडायचे राहीले आहेत. सगळा गलथान कारभार आहे. अशी संथप्त प्रतिक्रीया दिली. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडत "एकाही महिलेला या मंत्रिमंडळात स्थान दिलेल नाही. आणि महिलांचा आवाज बुलंद करण्यासाठी एकही महिला या मंत्रीमंडळात नाही याचा आम्ही निषेध करतो. अशी स्थापीत सरकारच्या निषेधीय प्रतिक्रीया कांयदे यांनी दिली. त्या पूढे म्हणाल्या "पालघर मध्ये काल जो प्रकार झाला आज समृद्धी च्या नावाखाली हे सरकार आलं आहे. हे गद्दारांच सरकार आहे' अशा सरकारकडून काय अपेक्षा करणार? अस म्हणत त्यानी शिंदे सरकारला टोला लगावला. अनेक ठिकाणी आज रस्ते खचले आहेत परंतु हे दिल्लीवारी करण्यामध्ये मजबूर आहेत . अशा प्रकारची आक्रमक टीका आ. मनिषा कायंदे यांनी केली

Tags:    

Similar News