हातोडा फेम किरीट सोमय्या आता काय करणार? Manisha Kayande

Update: 2023-03-17 05:45 GMT

भारतीय जनता पार्टीचे सदस्य किरीट सोमय्या हे ऐकत असतील तर त्यांनी आणि त्यांच्या पक्षाने रमेश पाटील भारतीय जनता पार्टीचे विधान परिषद सदस्यांनी काल एक महत्त्व पूर्ण वाक्य ऑन रेकॉर्ड सांगितले. भारतीय जनता पार्टीकडे गुजरात वरून आलेली निरमा वॉशिंग पावडर आहे आणि भारतीय जनता पार्टीकडे जे जे लोक येतील कलंकित, डागी , केसेस असलेले , ईडी,इन्कम टॅक्स त्यांच्याकडे नोटीस आलेल्या आहेत किंवा धाडी पडलेल्या आहेत. या सगळ्यांना धुण्याचे काम आम्ही करत असतो. असं वाटतं त्यांच्या जे पोटात आहे ते ओठांवर आलेलं आहे आणि हे कुठे नाही तर सभागृहाच्या पटलावर सुद्धा ऑन रेकॉर्ड आलेला आहे. त्यामुळे आम्ही जे बोलत होतो इतके दिवस आता हातोडा फेम किरीट सोमय्या काय करणार आहेत? जिथे जिथे त्यांची मंडळी ओरडत असतात आता ती काय करणार आहेत? याचे उत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले पाहिजे. सगळ्यांना त्रास द्यायचा मग त्यांनी भाजप मध्ये प्रवेश केला की, सगळे धुवुन निघतात. ज्यांच्यावर ईडीच्या धाडी पडत आहेत त्यांच्यासाठी हे निमंत्रण असल्याचं मनिषा कायंदे यांनी म्हंटले आहे. काय म्हंटल आहे त्यांनी पहा..



 

Tags:    

Similar News