नवज्योत सिध्दूंना हरवणारी आपची 'पॅड'वुमन कोण?

पंजाब मध्ये 'आप'ने न भुतो न भविष्यती असा एकतर्फी विजय मिळवला आहे. अमृतसर पुर्व विधानसभेमध्ये नवज्योत सिंह सिध्दू आणि विक्रम मजिठिया याच्यात जिंकणार कोण अशा चर्चा सुरू असताना 'आप'च्या जीवन जोत कौर या नवख्या महिलेने ही बाजी मारली आणि सगळ्यांच्या भुवया उंचावल्या.

Update: 2022-03-10 12:58 GMT

जाब विधानसभेच्या निवडणुका झाल्यापासून अमृतसर पूर्व विधानसभा ही हॉट सीट होती. काँग्रेसचे नवज्योत सिध्दू येथून निवडणूकीच्या रिंगणात उतरले होते. त्यांच्या वारंवारच्या आव्हानावर अकाली दलाचे दिग्गज नेते जनरल बिक्रम मजिठिया यांनी निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यानंतर या जागेचा पारा चांगलाच चढला होता.

नवज्योत सिद्धू आणि बिक्रम मजिठिया यांच्या विरोधात आम आदमी पार्टीने महिला उमेदवार जीवन जोत यांना उभे केले होतं. मात्र, सर्वाचं लक्ष सिद्धू विरूध्द मजिठिया यांच्या लढाईवर होतं. जीवन जोतने आश्चर्यकारक कामगिरी करत विजय मिळवला. दोन दिग्गजांना पराभूत करणाऱ्या आम आदमी पक्षाच्या जीवन जोत कौर यांना अमृतसरमध्ये 'पॅड'वुमन म्हणून ओळखले जाते. ती पंजाबमधील तुरुंगातील महिला कैद्यांना सॅनिटरी नॅपकिन पुरवण्याचं काम करते.

कोण आहे आपची 'पॅड'वुमन जीवन जोत कौर?

गुरुनगरीतील 'पॅड'वुमन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जीवन जोतने गरीब महिलांना प्लास्टिक सॅनिटरी पॅड्सच्या वापरामुळे होणाऱ्या दुष्परिणामांबद्दल जागरूक केले आहे. जीवन जोत कौर यांनी एका परदेशी कंपनीशीही करार केला आहे, जी ग्रामीण महिलांना पुन्हा वापरता येणारे सॅनिटरी पॅड मोफत पुरवते. जीवन ज्योत ही 'She Society' च्या संस्थापकही आहेत. त्यांची संस्था समाजातील गरीब लोकांच्या कल्याणासाठी कार्य करते.

महिलांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या या कार्यकर्तीने पंजाबच्या तुरुंगात बंद असलेल्या महिलांना सॅनिटरी पॅड उपलब्ध करून देण्याची मोहीम राबवली होती. याशिवाय पूर्वेकडील अंमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या मुलांची सुधारणा आणि पीडित कुटुंबांचे समुपदेशन करण्याचे काम त्यांनी केले होते.


'आप'ने त्यांना पूर्वेकडून उमेदवारी दिल्यावर त्यांनी घरोघरी जाऊन महिलांशी संपर्क साधला आणि आपल्या मुलांच्या भवितव्याचा हवाला देत आम आदमी पक्षाचे सरकार स्थापन करण्याचे आवाहन केले. त्यानंतर जे घडलं तो इतिहास घडला. त्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी नवज्योतसिंग सिद्धू यांचा ६७१३ मतांनी पराभव केला.

Tags:    

Similar News