"लोक म्हणतात की रात्र वैऱ्याची आहे पण..." : किशोरी पेडणेकर

Update: 2023-03-02 10:03 GMT

 शिवसेना पक्ष आणि शिवसेनेचे चिन्ह धनुष्यबाण दोन्ही निवडणूक आयोगाने शिंदे गटाच्या नावे केले आणि त्यामुळे तीव्र नाराजी ठाकरे गटात पसरली होती. यावर संजय राऊत यांनी अनेकवेळा टीकाही केली आहे. त्यावरून गदारोळ पण माजला होता .

ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकर या छत्रपती संभाजीनगर येथे शिवगर्जना अभियानांतर्गत भव्य मेळाव्यात बोलत होत्या . तापडिया नाट्य मंदिरात हा मेळावा पार पडला. या मेळाव्यासाठी मुख्य मार्गदर्शक म्हणून ठाकरे गटाच्या उपनेत्या किशोरी ताई पेडणेकर यांनी मार्गदर्शन केले आहे .

किशोरी पेडणेकर यांनी भाजपविषयी बोलताना "प्रमोद महाजन गोपीनाथ मुंडे हे आदरणीय आहे बाकीच्यांची नाव घेण्याची लायकी सुद्धा नाही"असे थेट विधान केले आहे. किशोरी पेडणेकर यांनी शिवसैनिकांना आव्हान केले आहे "आता चवताळून उठण्याची वेळ आली आहे"असं म्हणत लोकांना प्रोत्साहित केले आहे .त्याचबरोरबर लोक म्हणतात की,"रात्र वैऱ्याची आहे पण आता दिवस देखील वैऱ्याचा आहे" तसेच देवाचे सोंग घेऊन बाबा हे सत्तेत बसलेले आहे.असेही उद्गार किशोरी पेडणेकर यांनी काढले आहेत .

देशात आणि जगात सर्वात उत्कृष्ट मुख्यमंत्री मंत्री म्हणून उद्धव ठाकरे हेच आहेत.छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगते ,मी कोणताही चुकीचा काम केलं नाही मी उद्धव बाळासाहेब ठाकरे या ब्रँड नावासोबत काम करत आहे म्हणून आम्हाला छळलं जातं आहे. आपला धनुष्यबाण हा उघड उघड चोरला आहे, आपल्याकडे आता मशाल आहे, यदा कदाचित मशाल देखील आपल्याकडे राहणार नाही . किशोरी पेडणेकर यांनी हि भावनिक मते छत्रपती संभाजीनगर येथे शिवगर्जना अभियानांतर्गत भव्य मेळाव्यात मांडली आहेत .

Tags:    

Similar News