मनसैनिकांनी 'त्याला' पकडून मारलं तर जबाबदारी आमची नाही – रुपाली पाटील ठोंबरे

Update: 2020-11-25 14:45 GMT

राज्यात सध्या पदवीधर निवडणूकांमुळे वातावरण चांगलंच तापलं आहे. या निवडणूक काळात सध्या चर्चा होतेय ती मनसेच्या उमेदवार रुपाली पाटील ठोंबरे यांना आलेल्या धमकीच्या फोन ची. या फोनमुळे मनसेचे कार्यकर्ते सध्या आक्रमक झाले आहेत.

याच संदर्भात पुण्यातील एका सभेत बोलताना रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या की, "मला आलेल्या धमकिची मी रितसर तक्रार केली आहे. पोलीसांनी कमल 506 आणि 354 प्रमाणे FIR दाखल केला आहे. सोमतच मी पोलीसांना आवाहन केलंय तुम्ही त्यांना लवकर पकडा. अन्यथा आमच्या मनसे बंधू भगिनींनी त्यांना पकडून मारलं तर त्याची जबाबदारी आमची रहाणार नाही." असं म्हटलं आहे.

सोबतच रुपाली ठोंबरे यांनी "धन शक्ती विरुध्द जन शक्ती ही निवडणूक आहे. कारखानादार आणि शिक्षण सम्राट हे उमेदवार आहेत. ज्यांनी कधी पद्धविधरांचे प्रश्न सोडविले नाहीत. महाविकास आघाडीचे पुणे पदवीधरचे उमेदवार म्हणजे आजोबा पदवीधर आहेत, कारण त्यांचे वय 75 वर्ष आहे, तर भाजपचे उमेदवार म्हणजे बुडीत कारखानदार आहेत." असं म्हणत विरोधकांचाही चांगलाच समाचार घेतला आहे.


Full View


Tags:    

Similar News