विरोधकांनी सरकारवर टीका करण्यापेक्षा स्वत: नियम पाळावेत – तृप्ती देसाई

Update: 2021-02-22 09:15 GMT

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना पुन्हा लॉकडाउन लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यातच कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येवर विरोधकही सरकार कोरोना परिस्थिती हाताळण्यात अपयशी झाल्याची टीका करत आहेत. यावर सामाजीक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी फेसबूक पोस्टच्या माध्यमातून विरोधकांना सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे.

मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलेल्या "मी जबाबदार" या मोहिमेला सर्वानी प्रतिसाद दिला पाहिजे आणि त्याची सुरुवात आपल्यापासून करणे गरजेचे आहे .म्हणूनच आजपासून मास्क घाला, गर्दी टाळा आणि सोशल डिस्टंसिंग पाळा याचे मी पालन करून आज पासून कोणत्याही गर्दीच्या कार्यक्रमात जाणार नाही तसेच काही नियोजित दौरे कार्यक्रमांसाठी आहेत ते पूर्णपणे रद्द करणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी जे आवाहन केले आहे. त्या आवाहनाला एक जबाबदार नागरिक म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहोत. आपले राज्य पुन्हा एकदा "कोरोना मुक्त" करण्यासाठी आपल्या सर्वांना याचे पालन करणे गरजेचे आहे. विरोधकांनी सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या या आवाहनाला टीका करण्यापेक्षा स्वतः सर्व नियम पाळणे गरजेचे आहे. भूमाता ब्रिगेडच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना तसेच माझ्या संपर्कात असणाऱ्या आणि मला मानणाऱ्या सर्व नागरिकांना माझे जाहीर आवाहन आहे की "मुख्यमंत्र्यांना साथ देऊया आणि कोरोनाचे नियम पाळूया"

- तृप्तीताई देसाई, संस्थापक अध्यक्षा भूमाता ब्रिगेड ,भूमाता फाऊंडेशन.

Tags:    

Similar News