toolkit case : देशद्रोहाचा आरोप असलेल्या 21 वर्षीय दिशा रवी यांच्या बद्दल या 5 गोष्टी

Update: 2021-02-15 11:45 GMT

दिल्लीमध्ये सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या ग्रेटा थनबर्गने जे टूलकिट (toolkit) सोशल मीडियावर व्हायरल केले होते, त्या टूलकिट प्रकरणी २२ वर्षांची पर्यावरणवादी कार्यकर्ती दिशा रवी (Disha ravi) हिला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. दिशाला बंगळुरुमधून शनिवारी अटक करण्यात आली.

कोण आहे दिशा रवी जाणून घ्या या 5 गोष्टी

1) 21 वर्षीय दिशा पर्यावरणवादी कार्यकर्ता आहे ती 'फ्रायडे फॉर फ्युचर' या संस्थेच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहे. एवढच नाही तर हवामान बदलांसदर्भात देखील काम करते

2) बंगळुरूतल्या माऊंट कॅर्मेल महाविद्यालयातून पदवी घेतलेली दिशा 'फ्रायडे फॉर फ्युचर' या संस्थेच्या भारतीय शाखेचं नेतृत्त्व करते. या संस्थेची स्थापना ग्रेटा थनबर्गनं २०१८ मध्ये केली. या संस्थेची भारतीय शाखा दिशानं २०१९ मध्ये सुरू केली.

3) हवामान बदलासंदर्भात दिशानं देशभरात अनेक उपक्रम राबवले आहेत. हवामान बदलाविषयी बंगळुरूत अनेक आंदोलनं केली आहेत. हवामान बदलाचे पर्यावरणावर होणारे प्रतिकूल परिणाम याबद्दल दिशानं जगभरातील अनेक माध्यमांमध्ये लिखाण केलं आहे.

4) पर्यावरण चळवळीची प्रेरण दिशाला तिच्या आजोबांकडून मिळाली आहे. दिशाचे आजी आजोबा शेतकरी असून हवामानांतील बदलांमुळे होणारे शेतीचे नुकसान दिशाने पाहिले आहे. त्यामुळे आपण हवामानातील बदलांवर काम करत असल्याचं दिशा सांगते.

5) दिल्ली पोलीसांच्या आरोपांनुसार टूलकिट प्रकरण म्हणजे खलिस्तानी फुटीरतावाद्यांना उभारी देण्यासाठी आणि भारत सरकारविरूद्ध हा मोठा कट आहे. आणि हे टूलकिट दिशाने संपादित केल्याचं पोलीसांनी म्हटलं आहे.

Tags:    

Similar News