Elon Musk ने Narendra Modi यांना केले फॉलो, यापाठीमागचे खरे कारण काय?

Update: 2023-04-12 02:16 GMT

 जगातील दुसऱ्या क्रमांकाची श्रीमंत व्यक्ती आणि टेस्ला, ट्विटर आणि स्पेसएक्सचे मालक इलॉन मस्क (Elon Musk ) यांनी सोमवारी (10 एप्रिल) पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi )यांना ट्विटरवर फॉलो केले. सध्या मस्क संपूर्ण जगात फक्त 194 लोकांना फॉलो करतो, ज्यात PM मोदी आहेत...




 


पंतप्रधान मोदी हे चौथे नेते ठरले आहेत ज्यांना मस्क फॉलो करतात. पंतप्रधान मोदींव्यतिरिक्त एलोन मस्क ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक, अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांना फॉलो करतात. (Rishi Sunak, Barak Obama , Emmanuel Macron )

इलॉन मस्क यांचे ट्विटरवर सर्वाधिक फॉलोअर्स आहेत..

अलीकडेच इलॉन मस्क ट्विटरवर सर्वाधिक फॉलो केले जाणारे व्यक्ती बनले आहेत. त्यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि प्रसिद्ध गायक जस्टिन बीबर यांना मागे टाकले आहे. सध्या 134.3 दशलक्ष लोक इलॉन मस्कला ट्विटरवर फॉलो करतात. 2020 मध्ये बराक ओबामा या यादीत पहिल्या क्रमांकावर होते. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सनुसार, ट्विटरचे सुमारे 450 दशलक्ष मासिक सक्रिय वापरकर्ते आहेत. मस्कच्या फॉलोअर्सची संख्या ट्विटरच्या एकूण वापरकर्त्यांपैकी 30% आहे.




 


आता अचानक इलॉन मस्क यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फॉलो केल्यामुळे त्यांची नजर भारतीय भाजारपेठेवर असल्याची चर्चा आहे. लवकरच ते भारतात टेस्ला या इलेक्ट्रिक कारचे लॉन्च करणार असल्याचं देखील म्हंटल जात आहे.. बाकी तुम्हाला काय वाटतं कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा.. 





 


Tags:    

Similar News